Loksabha Election : अमित शाहांनी पाच टप्प्यातील मतदानानंतर मोदींना मिळालेल्या जागांचा थेट आकडाच सांगितला, म्हणाले...

Amit Shah Vs Rahul Gandhi : राहुल गांधींच्या जागांबाबतही केलं आहे भाकीत, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत?
Amit Shah
Amit ShahSarkarnama

Loksabha Election Voting : लोकसभा निवडणूक 2024च्या सातव्या टप्प्याती मतदानाच्या प्रचारासाठी गृहमंत्री अमित शाह हिमाचल प्रदेशातील उना येथे पोहचले आहे. यावेळी त्यांनी जनतेला संबोधित करताना एक मोठं विधान केलं. अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यातील मतदानानंतर पंतप्रधान मोदींना म्हणजेच भाजप, एनडीए आघाडीला एकूण किती जागा मिळाल्या आहेत, याचा थेट आकडाच सांगितला आहे. तर राहुल गांधींना या निवडणुकीत किती जागा मिळतील याबाबतही भाकीत केलं आहे, अमित शाहांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळातून उलट सुलट चर्चा सुरू आहेत.

आतापर्यंत पार पडलेल्या लोकसभेच्या पाच टप्प्यातीत मतदानांतर मोदी(PM Modi) हे 310 जागांच्या पुढे पोहचले आहेत आणि सहाव्या व सातव्या टप्प्यात त्यांना 400 पार पोहचवून पुन्हा एकदा पंतप्रधान बनववायचे आहे. सातवा टप्पावाल्यावंर 400 पार नेण्याची जबाबदारी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Amit Shah
lok Sabha Election 2024 News : राज्या-राज्यातला आकडा सांगत, असं येणार काँग्रेसचं बहुमताचं सरकार; 'या' बड्या नेत्याचा दावा

याचबरोबर अमित शाह यांनी राहुल गांधींवर(Rahul Gandhi) निशाणा साधत म्हटले की, राहुलबाबा 40 पेक्षाही कमी जागांवर येत आहेत. आमच्या तीन विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांना निवडून द्या, येथे(हिमाचलमध्येही) कमळाच्या फुलाचे सरकार बनेल.

राम मंदिराच्या मुद्य्यावर गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) म्हणाले, राहुल गांधी आणि त्यांची बहीण शिमल्यात सुट्टी घालवण्यासाठी तर येतात, परंतु आपल्या व्होट बँकेच्या भीतीपोटी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेस आले नाहीत. त्यांची व्होट बँक रोहिंग्या, घुसखोर आहे, ज्यांना घाबरून ते राम मंदिराच्या कार्यक्रमास गेले नाहीत. अमित शाह म्हणाले, या निवडणुकीत इकीकडे दर सहा महिन्याला सुट्टी घालवणारे राहुलबाबा आहेत आणि दुसरीकडे 23 वर्षांपासून दिवाळीचीही सुट्टी न घेता लष्कराच्या जवानाबरोबर सीमेवर मिठाई खाणारे नरेंद्र मोदी आहेत.

Amit Shah
Rakesh Daulatabad : हरियाणातील अपक्ष आमदाराचे हृदयविकाराने निधन; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक!

याशिवाय इंडिया आघाडीवर टीका करताना अमित शाह म्हणाले की, यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही. एका पत्रकारने त्यांना विचारले की तुमचा पंतप्रधान कोण आहे? तर त्यांनी उत्तर दिलं की, पाळीपाळीने एक-एक वर्षी एक-एक व्यक्ती बनेल. राहुलबाबा हे किराणा दुकाना नाही, 140 कोटी लोकांचा देश आहे.

POK भारताचा आहे, राहील आणि आम्ही तो घेऊच -

गृहमंत्र्यांनी म्हटले की, काँग्रेसचे नेते आम्हाला घाबरवतात की पीओकीबद्दल बोलू नका, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. मात्र मी आज देवभूमीतून सांगतो की, राहुलबाबा आम्ही भाजपवाले आहोत, अणुबॉम्बला घाबरत नाही. मी स्पष्ट करू इच्छितो की, पीओके भारताचा आहे, राहील आणि आम्ही तो घेऊनच राहू.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com