Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तीन पक्ष आपण सोबत आहोत. तीन पक्ष मिळून आपण सरकार चालवतोय आणि आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका आपण तीनही पक्ष एकत्रित लढणार आहोत.
आपल्या किती जागा मिळतील याची काळजी करुन नका. तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा मिळणार आहेत. ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो उमेदवार निवडून येणार आहे, तो उमेदवारही मोदींकरिता हात वर करणार असल्याचा सूचक इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, आगामी लोकसभा (Loksabha), विधानसभा (Vidhansabha) निवडणुका आपण पक्ष एकत्रित लढणार आहोत. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी काम करायचे आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात आपणच निवडणूक लढणार आहोत या भावनेतून लोकसभेसाठी प्रतिष्ठा पणाला लावायची आहे.
त्यासाठी आपली क्षमता असली पाहिजे, त्याच क्षमतेने आपण मैदानात उतरायचे आहे. विकसित भारत संकल्प यात्रा (Viksit Bhart Sankalp Yatra) सुरु झाली आहे. ही एक अशी यात्रा आहे जी आपल्याला जनसामान्यांपर्यंत पोहचवते. याच माध्यमातून आपण केलेले काम, लोकांसाठी राबविलेल्या योजना आपण तळागाळापर्यंत न्यायच्या आहेत.
सध्याच सरकार आपलच आहे, त्यामुळे काळजी करण्याच कारण नाही. लोकसभेला तुमच्या मनात असतील तेवढ्या जागा मिळणार आहेत. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तीनही पक्ष मिळून आपण एकत्रित निवडणुका लढवणार आहोत. प्रत्येक जागेवर आपला उमेदवार कसा निवडून येईल याकडे लक्ष केंद्रीत करायचे आहे.
ज्या जागा आपण लढत नाही तिथे जो उमेदवार निवडून येणार आहे, तो उमेदवारही मोदींकरीता काम करणार आहे. त्यामुळे काळजी करायच काही कारण नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. देशासह राज्यात सरकारने केलेले काम लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
एका परिवासाला जेवढ्या प्रकारच्या योजनांचा लाभ मिळू शकतो तेवढे सगळे लाभ लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ही यात्रा सुरु करण्यात आली आहे. देशामध्ये मोदींनी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये विश्वकर्मा सारख्या कार्यक्रमातून देशात पहिल्यांदा बाराबलुतेदारांचा विचार मोदींनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या योजनेच्या मिळणाऱ्या लाभातून त्यांच्या जीवनात बदल होणार आहेत. मध्यंतरी मोदींनी झारखांडमधील आदिवासींसाठी पंचवीस हजार कोटींची योजना सुरु केली. आदिवासींच्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहचविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्यासाठी मुलभुत सुविधा तसेच रोजगाराच्या संधी यातून उपलब्ध केल्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.