येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपची रणनीती ठरली आहे. त्याचे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील कार्यसमितीच्या बैठकीत आज दिली. ओबीसी हा भाजपसाठी महत्त्वाचा घटक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली विश्वकर्मा योजना तळागाळापर्यत पोहोचवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले. या निमित्ताने लोकसभेसाठी फडणवीसांनी 'ओबीसी' गिअर टाकल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले.
महायुती सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार, त्याचवेळी ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्याचवेळी मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनी केला असा गंभीर आरोप फडणवीसांनी केला. आता आरक्षण मागत आहात तर एवढी वर्षे तुम्ही का दिले नाही, असा सवालही फडणवीसांनी केला.
लोकसभा निवडणुकीत भाजप किती जागा लढवेल, असा प्रश्न पडला असेल तर चिंता करू नका. तुमच्या मनात आहेत तेवढ्या जागा आपण लढवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. आपल्यासोबत शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पुढील दोन्ही निवडणुका तिन्ही पक्ष एकत्र लढवतील, असेही फडणवीसांनी सांगितले.
पाच राज्यांच्या निकालात पंतप्रधान नरेंद्र मोदींची गॅरंटी चालली. गॅरंटी म्हणजे पंतप्रधान मोदींची विश्वासार्हता तर राहुल गांधींची गॅरंटी लोकांनी नाकारली. विरोधकांनी 'इंडिया' आघाडी तयार केली पण त्यांच्यासमोर देशाच्या विकासाचा अजेंडा नाही. 'इंडिया' आघाडी म्हणजे परिवारवादी पक्षांची आघाडी. तर मोदींसाठी देश हा परिवार आहे. हा या दोघांमधील फरक असल्याचे फडणवीसांनी सांगितले. ही परिवारवादी मंडळी केवळ मोदींना हटवण्यासाठी एकत्र आले आहेत, असा आरोप फडणवीसांनी केला.
भाजपही यापूर्वी विरोधी पक्षात होता. मात्र, आपण विचारांचे विरोधक होतो, देशाचे विरोधक नव्हतो. सध्या महाराष्ट्रातील आणि देशातील विरोधी पक्षाला देशाची, समाजाची चिंता नाही. त्याचे वर्तन खोटे बोला रेटून बोला, असे असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
पंतप्रधान मोदींनी विश्वकर्मा योजनेला प्राधान्य दिले आहे. या बारा बलुतेदारांसाठी म्हणजे मायक्रो ओबीसींसाठी आपण वेगवेगळी महामंडळे काढून स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न दिला. भाजप ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही. त्याचवेळी शिवसेनेने मंडल आयोगाला विरोध केला होता म्हणून त्यावेळी भुजबळांनी शिवसेना सोडली, असेही सांगितले.
(Edited by - Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.