Chahat Pandey Joins Aam Aadmi Party: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री चाहत पांडे (Chahat Pandey) हीने आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. चाहतने आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. "प्रसिद्धी, पैसा सोडून मी राजकारणात येत आहे," असे तिनं आम आदमी पक्षात प्रवेश केल्यानंतर माध्यमांना सांगितलं.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी गुरुवारी दिल्ली येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संदीप पाठक यांच्या उपस्थितीत चाहतने प्रवेश केला. मध्यप्रदेशातील दमोह आणि बुंदेलखंडचा विकास करण्यासाठी आपमध्ये प्रवेश करीत असल्याचे चाहत हिने सांगितलं.
चाहत पांडे म्हणाली, "अभिनय क्षेत्रात जाऊन स्वतःची ओळख निर्माण करणं हे माझे स्वप्न होते. ते मी पूर्ण केले. आता मला माझ्या जन्मभूमीसाठी, समाजासाठी काही तरी करायचे आहे. मध्यप्रदेशात दमोह जिल्ह्यात बाल कामगार खूप आहेत, येथील बालकामगार, श्रमिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे,"
दरम्यान, पाटण्यात नुकतीच विरोधी पक्षाची बैठक झाली. या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी भूमिका वेगळी होती. बैठकीला उपस्थित राहिल्यानंतरही आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दिल्लीत केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या विरोध करण्यासाठी काँग्रेसने समर्थन द्यावे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली आहे.
मोदी सरकारच्या समान नागरी कायद्याला केजरीवाल समर्थन देण्याच्या भूमिकेत आहे. या मुद्यावर ते विरोधी पक्षाच्या एकतेच्या विरोधात भूमिका घेतात का, याकडे विरोधी पक्षाचे लक्ष आहे. तर आगामी लोकसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार आहे, कुणालाही पाठिंबा देणार नाही, असे आप आदमी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव संदीप पाठक यांनी नुकतेच गोव्यात सांगितले आहे. यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांचा भुवया उंचावल्या आहेत.
समान नागरी कायदा लागू करण्याबाबत केंद्रात मोदी सरकारच्या हालचालीला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून समान नागरी संहितेची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विधि आयोगाने सर्व सार्वजनिक आणि धार्मिक संघटनांकडून सूचना मागवल्या आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.