Madhya Pradesh News : मिनी लोकसभा म्हणून पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे पाहिले जात होते. त्यामुळे या निकालांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.निवडणुकांच्या निकालामध्ये तीन राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने दमदार कमबॅक केले आहे.
तसेच सोमवारी जाहीर झालेल्या मिझोरम विधानसभा निवडणुकीमध्ये झोरम पीपल्स मुव्हमेंट (ZPM) हा पक्ष 40 पैकी 27 जागांवर विजय मिळवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, या निवडणुकांमध्ये जसे सर्वाधिक मतांनी काही उमेदवार विजयी झाले तसेच काहीजणांची बोटावर मोजण्याइतपत मतांनी आमदारकीची संधी हुकल्याचेही समोर आले आहेत.
मध्य प्रदेशात भाजपने (BJP) 163,राजस्थानमध्ये 115 आणि छत्तीसगडमध्ये 54 जागा मिळवत भाजपने काँग्रेसला पराभवाचा धक्का देत विजय खेचून आणले आहे.तर तेलंगणातही 1 जागेवरुन 8 जागांवर विजय मिळवला आहे.लोकसभेच्या आधी या निवडणुका होत असल्याने भाजप आणि काँग्रेसकडून या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या होत्या.
यात मध्य प्रदेशमधील इंदूर 2 च्या जागेवर भाजपच्या रमेश मेंडोला यांचा एक लाखांहून अधिक मतांनी निवडून आले आहे. हा त्यांचा विजय चार राज्यांतील एकूण 638 जागांपैकी सर्वात मोठा विजय आहे. तर छत्तीसगडमधील कांकेरमध्ये काँग्रेसचे शंकर ध्रुव 16 मतांनी पराभव झाला आहे.(Assembly Elections Results)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच मध्य प्रदेशमधीलच शाजापूर मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत झाली. या ठिकाणी फेरमतमोजणी सुध्दा करण्यात आली.भाजपचे अरुण भिमवड हे सुरुवातीला 150 मतांनी विजयी झाले होते. मात्र, काँग्रेसचे हुकुमसिंह कराडा (Hukum Singh Karada) यांनी आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली. त्यानंतर भिमवड हे अवघ्या 28 मतांनी निसटता विजय मिळाला.
ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकांमध्ये मताला प्रचंड मोठी किंमत आहे. माझ्या एका मताने काय होणार आहे असे म्हणणारे अनेक मतदार अवतीभवती पाहायला मिळत असतात.पण एका मताने होणारा विजय किंवा पराभवाचं मोल संबंधित नेत्यांना चांगलेच जवळून ठाऊक असते. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्येही काही उमेदवारांना अशाच निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.
भाजपच्या आशा राम नेताम या अवघ्या 16 मतांनी निवडून आल्या. त्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला. तर दुसरा सर्वात कमी मतांनी पराभव झालेल्यांमध्ये काँग्रेसच्या (Congress) हुकुमसिंह कराडा यांचा समावेश होता.
मध्य प्रदेशमधील शाजापूर मतदारसंघात भाजपचे अरुण भिमवाड (Arun Bhimwad) यांनी काँग्रेसच्या हुकुमसिंह कराडा यांचा अवघ्या 28 मतांनी धक्कादायकरित्या पराभव केला. राजस्थानमध्ये कोतपुतली जागेवर भाजपच्या हंसराज पटेल यांना निसटता विजय मिळवितानाच काँग्रेसच्या राजेंद्र सिंह यादव यांना अवघ्या 321मतांनी हार पत्करावी लागली.तर तेलंगणमध्ये चेवेल्ला जागेवर बीआरएसच्या यादय्या काळे यांनी काँग्रेसच्या बीम भारत पमेना यांना 268 मतांनी पराभवाची धूळ चारली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.