Election Results 2023 : इंदिरा गांधींचे सुरक्षा प्रमुख बनणार मुख्यमंत्री; निवडणुकीत केला चमत्कार

Lalduhoma : हा चमत्कार घडवून आणणारे नेते आहेत मुख्यमंत्रिपदाचे दावेदार लालदूहोमा.
Lalduhoma
LalduhomaSarkarnama
Published on
Updated on

Mizoram Assembly Election : मिझोरम विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडला आहे. हा चमत्कार घडवून आणणारे नेते आहेत मुख्यमंत्री पदाचे दावेदार लालदूहोमा. त्यांच्या झोरम पीपल्स मुव्हमेंट (ZPM) हा पक्ष या निवडणुकीत 40 पैकी 27 जागांवर विजयी पताका फडकावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लालदूहोमा हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, हे निश्चित आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सुरक्षा प्रमुख म्हणून काम केलेले लालदूहोमा यांच्या राजकीय प्रवासातील आजचा दिवस सर्वोच्च आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दुपारी दोन वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, झेडपीएमने 40 पैकी 25 जागांवर विजय मिळवला असून, दोन जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला केवळ सात जागांवर विजय मिळाला असून, तीन ठिकाणी आघाडी आहे. भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत, तर काँग्रेसला केवळ एकच जागा मिळू शकते. (Mizoram Vote Results)

Lalduhoma
Assembly Election Result : सुपडा साफ होऊनही काँग्रेसला ‘स्ट्राइक रेट’ने दाखवला आशेचा किरण

राज्यात सुरुवातीला सत्ताधारी, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होईल, अशी अंदाज वर्तवला जात होता. पण झेडपीएमने सर्वांचे अंदाज चुकीचे ठरवत सत्ता काबीज केली आहे. लालदूहोमा यांनी जवळपास तीन हजार मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 8 हजार 314 मते मिळाली आहेत. काँग्रेसमधून राजकीय प्रवास सुरू झालेले लालदूहोमा हे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असा आहे राजकीय प्रवास

लालदूहोमा यांच्या राजकीय प्रवासाला 1984 मध्ये सुरुवात झाली. लोकसभेच्या निवडणुकीत ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. त्याआधी ते 1972 मध्ये मिझोरम मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य सहायक म्हणून नियुक्तीस होते. 1977 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय पोलिस सेवेत रुजू झाले. त्यानंतर ते 1982 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा प्रमुख बनले. पुढे या पदाचा राजीनामा देत त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढविली.

Lalduhoma
Karne Shirisha News: म्हशीवाल्या शिरीषाने निवडणूक गाजवली अन् BRS च्या उमेदवाराला धोबीपछाड, पण...

दोनच वर्षांत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यामुळे लालदूहोमा यांना खासदारकी गमवावी लागली. पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारकी गमावलेले ते देशातील पहिले खासदार ठरले. त्यानंतर ते मिझोरममधील चळवळीत सहभागी झाले. मिझो फ्रंटची स्थापना झाल्यानंतर काही काळ सल्लागार म्हणूनही काम केले. पुढे त्यांनी झोरम नॅशनलिस्ट पार्टी स्थापन केली. या पक्षाकडून ते पहिल्यांदाच 2003 मध्ये विधानसभेत पोहाेचले.

2018 च्या निवडणुकीत लालदूहोमा यांच्या झोराम पीपल्स मुव्हमेंटमध्ये सहभागी झाला. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते, पण युतीची सत्ता न आल्याने ते विरोधी पक्षनेते बनले. काही दिवसांतच त्यांनी झोरम पीपल्स मुव्हमेंटला राजकीय पक्ष म्हणून नोंदणी झाली. त्याआधीच्या निवडणुकीत ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.

(Edited By - Rajanand More)

Lalduhoma
PM Narendra Modi : 'आता संसदेत राग काढू नका’, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना सल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com