Delhi News: देशातील चार राज्यांच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांचा समावेश आहे. या तीन राज्यांतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात जनतेला संबोधित केलं.
या वेळी मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत आजच्या विजयाने 2024 च्या हॅटट्रिकची गॅरंटी दिली, असं मोठं विधान करत 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही फुंकले. तसेच काँग्रेस आता तरी सुधारावं, अन्यथा काँग्रेसला जनता 'चुन चुन के साफ करेगी', अशा कडक शब्दांत मोदींनी काँग्रेसवर प्रहार केला.
तसेच भाजपने या निवडणुकीत दिलेली आश्वसनं पूर्ण करण्याची गॅरंटी देतो, असेही मोदी या वेळी म्हणाले. "जो देशाच्या विकासाला आडवं येईल, त्याला जनता हटवेल, आजचा निकाल हा घमंडिया आघाडीला धडा आहे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही खोटी आश्वासनं देत नाहीत. मतदारांची सेवा करण्यासाठी माझी तपस्या आहे. काँग्रेसने सुधारलं पाहिजे, अन्यथा जनता काँग्रेसला 'चुन चुन के साफ करेल', असा हल्लाबोल मोदींनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"आजचा तीन राज्यांचा निकाल हा काँग्रेस (Congress) आणि अहंकारी लोकांसाठी धडा आहे. भारत आता कधीही मागे हटणार नाही. पीछेहाट कधीही मोदी स्वीकारणार नाही. राजस्थानात काँग्रेस पुन्हा येणार नाही असं मी म्हटलं होतं. राजस्थानच्या जनतेवर माझा प्रचंड विश्वास आहे. काँग्रेसने केलेल्या भ्रष्टाचारामुळे त्यांचा सुपडासाफ झाला,"असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.
तेलंगणामध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, "आम्ही तेलंगणातील नागिरकांच्या सेवेत कायम राहू. या घोषणा तेलंगणापर्यंत पोहाेचल्या पाहिजेत. तेलंगणाच्या जनतेला मी आश्वासित करतो, भाजप तुमच्या सेवेमध्ये कोणतीही कमी पडू देणार नाही,"असं मोदींनी आश्वासित केलं.
(Edited by- Ganesh Thombare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.