CM Shivraj Singh Chouhan Sarkarnama
देश

Mission 29 : सातही जागा गमावलेल्या जिल्ह्यात ‘मामां’ची धाव; महिलांचे पाय धुतले अन् ‘मिशन २९’ ची घोषणा

Shivraj Singh Chouhan : विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला २३० पैकी १६३ जागांवर विजय मिळाला आहे.

Rajanand More

Madhya Pradesh Assembly Election : मध्य प्रदेशमध्ये भाजपने मोठा विजय मिळवत पुन्हा सत्ता काबीज केली. पण छिंदवाडा जिल्ह्यातील सर्व सात जागांवर पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. हा पराभव मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून त्यांनी बुधवारी या जिल्ह्यात धाव घेतली. तसेच एका सार्वजनिक कार्यक्रमात दोन महिलांचे पायही धुतले. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला (BJP) २३० पैकी १६३ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने राज्यातील अनेक भागांमध्ये मुसंडी मारत काँग्रेसचा (Congress) सुपडा साफ केला आहे. मात्र, छिंदवाडा जिल्हा त्याला अपवाद ठरला आहे. या जिल्ह्यात सात मतदारसंघ आहेत. तिथे भाजपला एकही जागा मिळालेली नाही.

चौहान यांनी बुधवारी छिंदवाडा दौऱ्यावर असून एका कार्यक्रमात त्यांनी महिला मतदारांचे आभार मानले. त्याचप्रमाणे दोन महिलांचे पाय धुवून त्यांचा सन्मान केला. मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना ही योजना लोकप्रिय ठरली आहे. योजनेमुळेच भाजपला घवघवीत यश मिळाल्याचा दावा भाजपच्या अनेक नेत्यांकडून केला जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मुख्यमंत्री चौहान यांनी छिंदवाडामध्येच ‘मिशन २९’ ची घोषणा केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नसला तरी चौहान यांनी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे. राज्यात लोकसभेच्या सर्व २९ जागा जिंकून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०१९ च्या निवडणुकीत भाजपला २८ जागा मिळाल्या होत्या, तर एक जागा काँग्रेसकडे गेली होती.

कार्यक्रमात बोलताना चौहान म्हणाले, यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेसाठी काम करत राहील. राज्याच्या विकासाचे आश्वासन मी देत आहे. प्रत्येक कुटुंबात एक नोकरी देण्याचे आश्वासन पूर्ण करायचे आहे. माझ्या बहिणींना दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण करायचे आहे. आज पासून आपण नवे मिशन सुरू करत आहोत. राज्यातील लोकसभेच्या सर्व २९ जागा जिंकण्याचे मिशन २९. त्यासाठी झोकून देत काम करू, अशी शपथ चौहान यांनी यावेळी घेतली.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT