Mahanaaryaman Scindia elected unopposed as the new President of Madhya Pradesh Cricket Association in his first-ever election. Sarkarnama
देश

Mahanaaryaman Scindia News : ज्योतिरादित्य शिंदेंच्या लेकानं जिंकली पहिली निवडणूक; आजोबा, वडिलांच्या पावलावर पाऊल...

Mahaaryaman Scindia elected unopposed as MPCA President : मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी महाआर्यमन शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाआर्यमन हे 29 वर्षांचे आहे.

Rajanand More

Madhya Pradesh Politics : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे पुत्र आणि मध्य प्रदेशातील शिंदे राजघराण्याचे वारस महाआर्यमन यांनी निवडणुकीच्या राजकारणात पहिले पाऊल टाकले आहे. ही निवडणूक कोणत्याही राजकीय पदासाठी नव्हती. पण या निवडणुकीत त्यांनी बिनविरोध विजय मिळवला अन् त्यांच्या राजकीय एन्ट्रीच्या चर्चेने चर्चांना उधाण आले आहे.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी महाआर्यमन शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठीच्या निवडणुकीत केवळ महानआर्यमन यांचाच अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले आहे. ते असोसिएशनचे सर्वात तरूण अध्यक्ष ठरले आहेत. तर आजोबा माधवराव शिंदे आणि वडील ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर शिंदे राजघराण्याची तिसरी पिढी MPCA च्या अध्यक्षपदी विराजमान झाली आहे. महाआर्यमन हे 29 वर्षांचे आहे.

माधवराव सिंधिया हे भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचेही अध्यक्ष होते. त्याचप्रमाणे महानआर्यमन यांच्या आईकडील नातेवाईकही क्रिकेटशी संबंधित आहेत. त्यांचे आजोबा संग्रामसिंह गायकवाड हेही बीसीसीआयचे अध्यक्ष होते. ते प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये बडोद्याचे प्रतिनिधित्व करायचे. शिंदे घराण्याचे 1982 पासून मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनवर वर्चस्व राहिले आहे.

माधवराव शिंदे हे यांनी अखेरपर्यंत असोसिएशनमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता. तिथे त्यांना विरोध करणारा कोणतारी राजकीय नेता धाडस करत नव्हता. पण ज्योतिरादित्य शिंदे यांना मात्र भाजपचे कैलाश विजयवर्गीय यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. 2010 आणि 2012 मध्ये विजयवर्गीय यांनी त्यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला होता. त्यावर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता होती. तर ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये होते.

ज्योतिरादित्य यांनी 2013-14 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. महानआर्यमन यांची असोसिएशनमधील एन्ट्री अत्यंत सुकर झाली आहे. त्यांचे वडील सध्या भाजपमध्ये असून केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे भाजप नेते विजयवर्गीय यांच्यासह कुणीही महाआर्यमन यांना विरोध केला नाही. त्यामुळे निवडणुकीत एकच अर्ज आला अन् त्याचीं बिनविरोध निवड झाली. विशेष म्हणजे या निवडीनंतर विजयवर्गीय यांच्या निकवर्तीयांसह इतर भाजप नेत्यांनीही महानआर्यमन यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती प्रसिध्द केल्या होत्या.

महाआर्यमन यांची ही निवडणूक म्हणजे निवडणुकीच्या राजकारणातील पहिले पाऊल समजले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्याकडे पाहिले जात आहे. शिंदे घराण्यातील राजकारणातील ही तिसरी पिढी ठरणार आहे. क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता त्यांच्याबाबत उत्सुकता वाढली आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT