Gst Council Meeting .jpg
Gst Council Meeting .jpgSarkarnama

GST News: अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची 'जीएसटी'बाबत मोठी घोषणा, आता दोनच टॅक्स स्लॅब असणार; 'या' वस्तू स्वस्त होणार

Nirmala Sitharaman GST announcement : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी GST बाबत बुधवारी (ता.3) मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री सीतारामण यांनी दिल्लीतील जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत जीएसटीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Published on

New Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील भाषणात जीएसटी करप्रणालीबाबत मोठी घोषणा केली होती. यात त्यांनी सरकार दिवाळीपर्यंत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मध्ये पुढील पिढीतील सुधारणा लागू करेल,दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी करून देशवासियांना दिलासा देण्याचं आश्वासन दिले आहे. आता जीएसटी GST बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी GST बाबत बुधवारी (ता.3) मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्री सीतारामण यांनी दिल्लीतील जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत जीएसटीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जीएसटीचे आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच स्लॅब असणार आहे. 12 आणि 28 टक्के जीएसटीचा स्लॅब रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

केंद्रातील मोदी सरकारनं जीएसटीच्या चारऐवजी दोन टॅक्स स्लॅबच्या निर्णयामुळे आता अनेक वस्तू स्वस्त होण्याची चिन्हे आहेत. मात्र, याचदरम्यान,चैनीच्या आणि हानीकारक असलेल्या वस्तुंसाठी वेगळा टॅक्स स्लॅब आणला गेला आहे, जो 40 टक्के इतका असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी दिल्लीत तब्बल 10 तास चाललेल्या जीएसटीच्या बैठकीत याबाबतची महत्त्वाची घोषणा केली आहे.

दिल्लीत सुषमा स्वराज भवन येथे बुधवारी पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलच्या मॅरेथॉन बैठकीत करप्रणालीत महत्त्वाचा बदल करण्याबाबत घेतलेला निर्णय जाहीर करण्यात आला. नव्या निर्णयानुसार आता 5 टक्के आणि 18 टक्के असे फक्त दोनच स्लॅब अस्तित्वात राहणार आहेत.

Gst Council Meeting .jpg
Devendra Fadnavis News: मराठा समाजानंतर आता OBC आंदोलन तापलं, राजकीय घडामोडी वाढल्या; CM फडणवीसांचा 'हा' मोठा निर्णय

मोदी सरकारच्या या जीएसटी करप्रणालीबाबतच्या अतिशय महत्त्वाच्या निर्णयामुळे व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना मोठी दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता यापुढे 12 टक्के जीएसटी असलेल्या 99 टक्के वस्तूंवर 5 टक्केच जीएसटी लागू कर असणार आहे.

तसेच 28 टक्के जीएसटी असलेल्या अनेक वस्तू 18 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून पान मसाला, तंबाखू यांसारख्या सिन गुड्स आणि लक्झरी गाड्यांवर तब्बल 40 टक्के जीएसटीचा नवीन स्लॅब प्रस्तावित असणार आहे. सरकारच्या जीएसटीबाबतच्या या निर्णयाची अंमलबजावणी घटस्थापनेपासून म्हणजेच 22 सप्टेंबरपासून होण्याची शक्यता आहे.

Gst Council Meeting .jpg
OBC strategy : ओबीसींच्या 'या' नव्या डावामुळे सरकारनं प्लॅनच बदलला; उपसमितीत हातचा राखला?

स्वस्त काय होणार?

जीएसटी बैठकीत 2,500 रुपयांच्या पर्यंतच्या पादत्राणे आणि कपड्यांना 5% जीएसटी स्लॅबमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त 1,000 रुपये पर्यंतच्या वस्तूसाठी हा दर लागू होता, तर त्यावरील वस्तूंसाठी 12% कर लागायचा. या निर्णयामुळे 2,500 रुपयार्यंतचे फुटवेअर आणि कपडे स्वस्त होणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com