KCR Politics : केसीआर यांना सर्वात मोठा धक्का; पक्षानं आमदार लेकीचीच केली हकालपट्टी...

K Kavitha Suspended from BRS: Official Announcement : के. कविता आणि पक्षातील नेत्यांमध्ये मागील काही महिन्यांपासूनच दुरावा निर्माण झाला होता. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी त्यांना अटक झाली होती.
K Kavitha
K KavithaSarkarnama
Published on
Updated on

KCR’s Decision and Political Impact : भारत राष्ट्र समितीमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील वादातून मंगळवारी सर्वात मोठा निर्णय घेण्याची वेळ नेत्यांवर आपली आहे. पक्षाचे प्रमुख व तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या आमदार लेकीला पक्षातून निलंबित केले आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांवर टीका करणे त्यांना भोवल्याचे कारण सांगितले जात आहे.

विधान परिषदेच्या आमदार के. कविता यांना बीआरएसमधून डच्चू देण्यात आला आहे. के. कविता यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते हरीश राव आणि संतोष राव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या नेत्यांनी आपले वडील आणि बीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. या षडयंत्रामागे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांचा हात असल्याचा दावाही के. कविता यांनी केला होता.

के. कविता आणि पक्षातील नेत्यांमध्ये मागील काही महिन्यांपासूनच दुरावा निर्माण झाला होता. दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी त्यांना अटक झाली होती. त्या जामीनावर तुरुंगातून बाहेर आल्यापासूनच पक्षांतर्गत वाद सुरू झाल्याची चर्चा होती. केसीआर यांनीही त्यांच्यापासून चार हात लांब राहणेच पसंत केले होते. यातूनच के. कविता यांची नाराजी समोर आल्याचे बोलले जाते.

K Kavitha
Manoj Jarange Patil Protest : सरकारने मागण्या मान्य केल्या अन् जरांगेंनी वादाच्या मुद्द्याला घातला हात!

काय म्हणाल्या होत्या के. कविता?

के. कविता यांनी सोमवारी खळबळजनक विधान केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्या म्हणाल्या होत्या की, काँग्रेस सरकार सतत केसीआर यांचे नावाचा जप करत हे. पण पुरस्थितीत लोकांची मदत करण्यास अपयशी ठरले आहे. केसीआर यांनी कधीही संपत्तीची पर्वा केली नाही. पण आज त्यांच्या प्रतिमेवर भ्रष्टाचाराचा डाग लावला जात आहे.

K Kavitha
Manoj Jarange: "आरक्षणाची लढाई जिंकलो" जरांगेंची घोषणा; अखेर पाच दिवसांनी उपोषण घेतलं मागे

हा डाग त्यांच्या आजूबाजूचे लोक, खासकरून हरिश राव आणि माजी खासदार मेगा कृष्ण रेड्डी यांच्यामुळे लागला आहे. मी केसीआर यांची मी मुलगी आहे. सोशल मीडियावर मला ट्रोल करणाऱ्यांना मी सोडणार नाही, असा इशाराही कविता यांनी दिला होता. केसीआर यांना सीबीआय चौकशीचा सामना करावा लागला तर मग पक्षाला काहीच अर्थ नाही?, असेही त्या म्हणाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com