Rahul Gandhi in Nanded Sarkarnama
देश

Rahul Gandhi : सरकार महाराष्ट्राचे नाही, अदानींनी विकत घेतलंय! राहुल गांधींनी ‘त्या’ बैठकीकडे दाखवलं बोट

Maharashtra Assembly Election Congress Nanded Rally Gautam Adani : राहुल गांधी यांच्या गुरूवारी नंदूरबार आणि नांदेड येथे प्रचारसभा झाल्या. यावेळी त्यांनी संविधानाच्या मुद्दयावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

Rajanand More

Nanded News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून आरोप-प्रत्यारोपांची धारही वाढली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरूवारी नांदेड येथील प्रचारसभेत महायुतीवर जोरदार प्रहार केला. हे सरकार अदानींनी विकत घेतल्याचा मोठा आरोप राहुल यांनी यावेळी केला आहे.

नांदेड येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, तुमचे सरकार चोरण्यात आले. कुणी चोरले? तुम्ही काय विचार करता? नरेंद्र मोदींचा त्यात हात नव्हता का? त्यांच्या नेत्याने सांगितले की, सरकार पाडण्यासाठीच्या बैठकीत अदानीही उपस्थित होते. राजकीय बैठकीत ते का होते? त्यांना धारावी हवी होती. त्यानंतर या सरकारने अदानींना धारावी दिली. एक लाख कोटींचा फायदा या सरकारने अदानींना मिळवून दिला आहे. गरीब, मजुरांची जमीन तुमच्यापासून हिसकावून घेतली जात आहे.

सरकार तुमचे नाही. महाराष्ट्राचे नाही, महाराष्ट्रातील युवकांचे नाही. सरकार अदानींचे आहे. त्यांनी सरकार विकत घेतले, आमदार विकत घेतले, हे सत्य असल्याचा जोरदार हल्लाबोल राहुल यांनी केला. देशात बेरोजगारीची समस्या आहे. महागाई वाढत चालली आहे. पण यामुळे अदानी-अंबानींना काहीही नुकसान होत नाही. त्यांची संपत्ती वाढतच चालल्याची टीकाही राहुल गांधींनी केली.

अदानी-अंबानींना विमानतळ, पोर्ट सगळेच दिले आहे. आणि आता धारावीही दिली जात आहे. काँग्रेसने 70 हजार कोटी रुपये हिंदूस्तानातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते. पण अदानींनी हजारो कोटी रुपये केवळ मुंबईत दिले जात आहेत, असा घणाघात राहुल यांनी केला. धारावीच्या पुनर्विकासावरून उध्दव ठाकरे यांच्याकडूनही महायुती सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. हाच मुद्दा राहुल गांधी यांनीही उपस्थित केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी दाखवत असलेल्या संविधानाची पाने कोरी असल्याची टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राहुल म्हणाले, संविधान त्यांच्यासाठी रिकामे आहे, कारण त्यांनी ते कधी वाचलेच नाही. या पुस्तकामध्ये काहीय लिहिले आहे, याची त्यांना कल्पना नाही. पुस्तक कोणत्या रंगाचे आहे, याचा आम्हाला फरक पडत नाही. या पुस्तकाच्या आतमध्ये काय लिहिले आहे, या महत्वाचे आहे. त्यासाठी आम्ही जीवही द्यायला तयार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT