Devendra Fadnavis, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Devendra Fadnavis: फडणवीसांचे राहुल गांधींवर गंभीर आरोप; लाल संविधानाचे कनेक्शन सांगितले...

Devendra Fadnavis on Rahul Gandhi: देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरूवात करताना राहुल गांधींना अर्बन नक्षलवादावरून टार्गेट केले आहे.

Rajanand More

Mumbai News: विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या असून आरोप-प्रत्यारोपांचा फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी सतत दाखवत असलेल्या संविधानावरच त्यांनी बोट ठेवले आहे. लाल रंगाचे संविधान दाखवून ते कोणाला इशारा देत आहेत, असे विधान फडणवीसांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीपासून राहुल गांधी यांच्याकडून प्रत्येक प्रचारसभेत संविधाना दाखवले जाते. ते संविधान लाल रंगाचे आहे. त्याचे कनेक्शन फडणवीसांनी अर्बन नक्षलवादाशी जोडले. तसेच त्यांनी भारत जोडो यात्रेबाबत गंभीर आरोप करताना राहुल गांधी देशात अराजकता पसवत असलेल्याचा गंभीर आरोप केला.

फडणवीस म्हणाले, भारत जोडो या समुहातील अनेक संघटना कट्टर डाव्या विचारांच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे, कामाची पध्दत बघितली तर ती अराजक पसरवणारी संपूर्ण व्यवस्था आहे. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे, पण राहुल गांधी लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कुणाला इशारा देत आहेत?

संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. संविधान आणि भारत जोडो यांच्या नावाखाली अराजक पसरवणाऱ्या लोकांना एकत्रित करून विद्वेष आणि अराजकता तयार करण्याचे काम होत आहे. अर्बन नक्षलवाद हा यापेक्षा वेगळा नाही, असे टीका फडणवीसांनी केली.

अर्बन नक्षलवाद म्हणजे, लोकांची मने प्रदुषित करायची, कलुषित करायची, त्यांच्यात अराजकतेचे रोपण करायचे, जेणेकरून देशातील संस्थांमधील त्यांचा विश्वास उडले आणि कुठेतरी देशाच्या एकतेला आणि एकात्मतेला धोका निर्माण होईल. हेच काम आज राहुल गांधींच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.

दरम्यान, राहुल गांधी यांची आज मुंबईत सभा आहे. महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते या सभेला उपस्थित राहणार आहे. त्यामुळे या सभेत राहुल गांधी फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT