Eknath Shinde : महाराष्ट्र पिंजून काढत एकनाथ शिंदे प्रचारसभांचा रेकॉर्ड मोडणार; 12 दिवसांचा प्लॅन ठरला

Eknath Shinde Maharashtra election campaign strategy: शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सभांना अधिक मागणी असल्याने ते बहुतेक सर्वच उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग पकडला असून सर्व नेते मैदानात उतरले आहेत. प्रचारासाठी आता जेमतेम 12 दिवसांचा कालावधी उरला असून आपल्या प्रत्येक उमेदवारासाठी सभा घेण्याची तयारी नेत्यांनी केली आहे. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सर्वाधिक प्रचारसभा होणार असून ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

शिंदे यांच्या प्रचारसभांचे 12 दिवसांचे प्लॅनिंग झाले असून तब्बल 48 सभा ते घेणार आहे. याचा अर्थ दररोज किमान चार सभांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महायुतीच्या एकत्रित सभाही होणार आहेत. शिंदे यांच्यासह सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक ‘करो या मरो’ अशी आहे.

Eknath Shinde
Maharashtra BJP: भाजपची मोठी कारवाई 40 बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी

प्रामुख्याने शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात झालेली उलथापालथ राजकारणाला हादरवून टाकणारी होती. त्यामुळे शिंदेंचे किती आमदार निवडून येणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली आहे. त्यांच्या पक्षाचे दोन अपवाद वगळता त्यांनी सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे.

मुंबई, विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह खान्देशातही शिंदे यांनी उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे या सर्वच ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वेळापत्रकानुसार शेवटची सभा ही मुंबई तसेच ठाण्यात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Eknath Shinde
Mahayuti And MNS : 'माहिम'मध्ये जमलं नाही, पण भाजपनं ते 'शिवडी'त घडवून आणलं, मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर

मुंबईच्या अंधेरी पूर्व येथून मुख्यमंत्र्यांनी प्रचाराचा नारळ फोडत सभांना सुरूवात केली होती. त्यानंतर सोमवारी त्यांच्या सातारा जिल्ह्यात सभा झाल्या. तर कोल्हापुरात महायुतीची एकत्रित सभा झाली. शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com