Phalodi Satta Baza Sarkarnama
देश

Satta Bazar Prediction : मतदानानंतर ‘फलोदी’तून आली भविष्यवाणी; महाराष्ट्रात युती की आघाडी?

Exit polls predict Mahayuti forming government in Maharashtra : बहुतेक एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येईल, असा अंदाज वर्तवला आहे.  

Rajanand More

News Delhi : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले अन् सर्वत्र राज्यात सत्ता कुणाची येणार, याबाबतच्या चर्चांना उधाण आले. विविध संस्थांच्या एक्झिट पोलने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवले आहे. बहुतेक पोलमध्ये महायुतीच पुन्हा सत्तेत विराजमान होणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. एक्झिट पोलप्रमाणेच आता सट्टा बाजारातूनही भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे.

देशातील अनेक सट्टा बाजारांचे महाराष्ट्रासह झारखंडच्या विधानसभा निवडणुकींच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. या बाजारांमध्ये निकालांवर कोट्यावधी रुपयांचा सट्टा लावला जातो. लोकसभा निवडणुकीवेळी सट्टा बाजारातून एनडीएच्या बाजूने भविष्यवाणी करण्यात आली होती. ही भविष्यवाणी खरीही ठरली होती. आता महाराष्ट्राचे कलही समोर आले आहेत.

राजस्थानातील प्रसिध्द फलोदी सट्टा बाजारात महायुतीच्या बाजूने कल दिसून आला आहे. महाराष्ट्रात महायुतीला 142 ते 151 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवत या बाजाराने राज्यात पुन्हा युतीचीच सत्ता येणार असल्याचा कल दिला आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा भाजप वरचढ ठरणार असून पक्षाला 90 ते 95 जागा मिळतील, असा अंदाज आहे.

महायुतीतील शिवसेनेला 36 ते 40 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 12 ते 16 जागा मिळतील, असा कल सट्टा बाजारातून समोर आला आहे. बीकानेर सट्टा बाजारानेही महायुतीला सत्ता मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीला मिळणाऱ्या जागांमध्ये फारसे अंतर नसेल, असाही अंदाज आहे. त्यामुळे निकालाबाबतची उत्सुकता आता वाढत चालली आहे.

विविध एक्झिट पोल्सची आकडेवारी -

इलेकोट्ल एज - महायुती - 121, मविआ- 150, अपक्ष - 20

पोल डायरी - 122-176, मविआ – 69-121, इतर - 12-19

चाणक्य स्ट्रॅटजीस - महायुती -152-160, मविआ - 130-138, इतर - 6-8

मॅट्रिझ – महायुती - 150-170, मविआ - 110-130, अन्य - 8-10

पीपल्स पल्स – महायुती - 175-195, मविआ – 85-120, अपक्ष - 7-12

पी मार्क - महायुती 137-157, मविआ - 126-146 अपक्ष – 2-8

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT