Amit Shah, Sharad Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar NCP : महापालिका निवडणुका जाहीर होताच दिल्लीत मोठी घडामोड; शरद पवारांच्या पक्षाचे 5 खासदार शहांकडे, कारण आले समोर

Supriya Sule Amit Shah meeting : सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियातून या भेटी माहिती दिली आहे. शहांकडे विविध प्रश्न मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Rajanand More

Delhi political developments : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी राज्यातील 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दिल्लीतही मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली.

खासदार सुळे यांच्यासोबत खासदार नीलेश लंके, सुरेश म्हात्रे, धैर्यशील मोहिते पाटील आणि भास्कर भगरे या चार खासदारही होते. सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धडाका सुरू आहे. यापार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी शहांची भेट घेत पाच महत्वाचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियातून या भेटी माहिती दिली आहे. शहांकडे विविध प्रश्न मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोरात शिक्षा व्हावी, अशी मागणी शहांकडे करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील महादेव मुंडे यांच्या खूनप्रकरणी तपासात कसलीही प्रगती होताना दिसत नाही. मुंडे यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर गजाआड करुन त्यांना कायद्याप्रमाणे कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका मांडल्याची माहिती त्यांनी दिली.

फलटण येथे झालेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचे प्रकरणही राज्यात चांगलेच गाजले होते. त्यावरून बरेच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले होते. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करुन दोषी व्यक्तींना शिक्षा व्हावे व मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केल्याचे सुप्रिया सुळे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.  

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्तांची दूरवस्थेबाबतही शहांना माहिती देण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातून अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत करावी, अशी मागणी शहांकडे करण्यात केली. याखेरीज नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत हिंसाचार झाला तसेच अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख रकमा आढळून आल्या. सुदृढ लोकशाहीसाठी हे चित्र योग्य नसून याबाबत आपण योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका मांडल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT