Modi Government : केंद्रीय मंत्र्यांनीच भाजप नेत्यांना पाडलं तोंडघशी; PM मोदी अध्यक्ष असलेल्या संस्थेबाबत मोठा खुलासा

Prime Ministers Museum and Library : पंडित नेहरूंची काही महत्वाची कागदपत्रे सोनिया गांधी यांनी नेल्याचा आरोप पात्रा यांनी केला होता. तसेच संग्रहालयाकडूनही राहुल गांधींना पत्र पाठवून ही कागदपत्रे जमा करण्याची विनंती केल्याचीही चर्चा होती.
Prime Ministers Museum and Library
Prime Ministers Museum and LibrarySarkarnama
Published on
Updated on

Nehru documents controversy : दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालय आणि पुस्तकालयाबाबत मोठा खुलासा समोर आला आहे. या खुलाश्यामुळे भाजपचे नेते तोंडघशी पडले आहेत. या संग्रहालयातील काही महत्वाची कागदपत्रे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी घेऊन गेल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला होता. मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरामध्ये या प्रकरणातील सत्य समोर आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसकडून सोशल मीडियात सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेले लेखी उत्तर पोस्ट केले आहे. भाजपचे खासदार संबित पात्रा यांनी लोकसभेत पंतप्रधान संग्रहालय आणि पुस्तकालयाशी संबंधित तारांकित प्रश्न उपस्थित केले होते. संग्रहालयाच्या वार्षिक निरीक्षणादरम्यान भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंशी संबंधित कागदपत्रे संग्रहालयातून गायब झाल्याचे आढळून आले आहे का, असा प्रश्न पात्रा यांनी विचारला होता.

संग्रहालयाकडे उपलब्ध कागदपत्रांची वार्षिक पडताळणी करण्याचे कोणते धोरण आहे का, अशी विचारणाही पात्रा यांच्याकडून करण्यात आली होती. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांन दिलेल्या लेखी उत्तरामध्ये पंडित नेहरूंशी संबंधित एकही कागदपत्रे गायब झाल्याचे आढळून आलेले नाही, असे उत्तर दिले आहे. या उत्तराने भाजप नेत्यांची बोलती बंद झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

Prime Ministers Museum and Library
Mahapalika Election : फडणवीस मुंबईबाहेर असतानाच एकनाथ शिंदेंचा टायमिंग शॉट : ठाणे, कल्याण-डोंबिवलीला तब्बल 200 कोटींची भेट

पंडित नेहरूंची काही महत्वाची कागदपत्रे सोनिया गांधी यांनी नेल्याचा आरोप पात्रा यांनी केला होता. तसेच संग्रहालयाकडूनही राहुल गांधींना पत्र पाठवून ही कागदपत्रे जमा करण्याची विनंती केल्याचीही चर्चा होती. शेखावत यांच्या उत्तरानंतर काँगेसने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान संग्रहालय व पुस्तकालय सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

Prime Ministers Museum and Library
Money Laundering Case : राहुल, सोनिया गांधींना मोठा दिलासा; कोर्टाकडून ED ला जोरदार झटका

काँग्रेसने पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाजपचा खोटेपणा उघडा पडला असून सत्य समोर आले आहे. भाजपने खोटा प्रेपोगेंडा पसरवला होता की, सोनिया गांधी यांनी संग्रहालयातील नेहरूंशी संबंधित कागदपत्रे ५१ पेट्यांमधून नेली होती. भाजप खासदार संबित पात्रा यांनी संसदेत कागदपत्रे गायब आहेत का, असा प्रश्न विचारला होता. हे चुकीचे असल्याचे मोदी सरकारच्या सांस्कृतिक मंत्र्यांनी म्हटले आहे. या खोटेपणाबद्दल आता भाजप व मोदींनी माफी मागायला हवी. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com