Mahatma Phule Jayanti_PM Modi Rahul Gandhi Discussion 
देश

म. फुले जयंती निमित्त भारतीय लोकशाहीचा सुखावणारा क्षण! PM मोदी, राहुल गांधींमध्ये बराच काळ झाली चर्चा; व्हायरल व्हिडिओचं युजर्सनं केलं कौतुक

PM Modi, Rahul Gandhi Discussion : संसदेच्या आवारात शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु असल्याचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

Amit Ujagare

PM Modi, Rahul Gandhi Discussion : संसदेच्या आवारात शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी या दोघांमध्ये बराच काळ चर्चा सुरु असल्याचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना युजर्सनं हा लोकशाहीतला आदर्श शिष्टाचार असल्याची भावना व्यक्त केली आहे. या व्हिडिओवर एवढी चर्चा होण्याच कारण म्हणजे मोदींनी अनेकदा राहुल गांधींवर कठोर शब्दांत टीका केल्याचं देशानं पाहिलं आहे. त्याचबरोबर राहुल गांधींनी देखील मोदींना कथित चुकीच्या धोरणांबाबत अनेकदा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचंही देशानं पाहिलं आहे. त्यामुळंच त्यांचा हा सहज संवाद पाहुन जनतेला आश्चर्य वाटलं नसेल तर नवलच म्हणावं लागेल.

नेमका विषय काय?

आजचा ११ एप्रिलचा दिवस हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस आहे. यंदाची महात्मा फुले जयंती खास यासाठी आहे की, यंदाचं वर्ष हे द्विशताब्दी जयंती वर्ष आहे. म्हणजेच महात्मा फुलेंची ही २०० वी जयंती आहे. त्यामुळं या विशेष पर्वानिमित्त वर्षभर शासनाकडून विविध कार्यक्रमांद्वारे फुलेंच्या विचारांचा आणि साहित्याचा जागर केला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून संसदेच्या आवारातील महात्मा फुलेंच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रीमंडळातील अनेक अनेक मंत्री आणि विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अनेक खासदारही उपस्थित होते.

PM मोदींनी केली राहुल गांधींची चर्चा

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या ताफ्यासह संसदेच्या आवारातील प्रेरणा स्थलावर पोहोचले तेव्हा राहुल गांधी, ओम बिर्ला, जेपी नड्डा, अर्जुन राम मेघवाल आणि इतर केंद्रीय मंत्री हे एकमेकांच्या बाजुला उभे होते. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं तसंच काही मिनिटं जागेवरच चर्चा केली. दोघांमध्ये चर्चा सुरु असताना त्यांच्याबाजूला इतर मंत्री उपस्थित होते व ते देखील मोदी आणि राहुल गांधींमधील चर्चा ऐकत होते. या चर्चेचा व्हिडिओ समोर आला आहे त्यानुसार, राहुल गांधी मोदींनी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पण नेमकी काय चर्चा झाली याबाबत खुलासा झालेला नाही. ही एक अनौपचारिक भेट असल्यानं दोघांमध्ये विशेष काही चर्चा झाली असेल असं वाटत नाही. पण कदाचित सोनिया गांधी यांची प्रकृती मध्यमंत्री ठीक नव्हती याबाबत पंतप्रधानांनी राहुल गांधींकडं विचारपूस केलेली असू शकते. त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या विषयी देखील काही चर्चा झालेली असू शकते, किंवा राहुल गांधींनी पंतप्रधानांशी काही सल्लामसलत केल्याचंही असू शकतं असं कळून येत आहे.

फुलेंचा गौरव

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी महात्मा फुलेंना २०० व्या जयंतीदिनानिमित्त अभिवादन केलं. तसंच त्यांच्या समता आणि सामाजिक न्यायासाठी असलेल्या समर्पित जीवनाचं कौतुक केलं. एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, "महान समाजसुधारक महात्मा फुले यांचं जीवन हे नैतिक साहस, आत्मचिंतन आणि समाजाच्या भल्यासाठी असलेल्या समर्पणाचं उदाहरण आहे" तर दुसरीकडं राहुल गांधी यांनी देखील म्हटलं की, ज्योतिबा फुले यांनी आपलं जीवन मागास समाजाच्या अधिकारांच्या रक्षणासाठी व्यतित केलं. भेदभाव आणि विषमतेविरोधात ज्योतिभा फुले यांच्याविरोधामुळं देशाला न्याय आणि समानतेचा रस्ता मोकळा झाल्याचं दिसून येतं. त्यांचा आदर्श सामाजिक न्याय प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांना प्रेरित करत राहील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT