Devayani Farande : धर्मांतरण करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोजर चालवा ; भाजप आमदार देवयानी फरांदे आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना साद..

Nashik conversion case : नाशिकमध्ये एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत हिंदू महिला व मुलींचा शाररीक व मानसिक छळ करण्यात आला. तसेच त्यांच्यावर धर्मांतरण करण्याचा दबाव टाकण्यात आला. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे.
Devayani Farande, devendra fadnavis
MLA Devayani FarandeSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : एकापाठोपाठ घडलेल्या तीन घृणास्पद घटनांनी नाशिक शहराचे नाव बदनाम होत असल्याची नागरिकांमध्ये भावना आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकच्या तिन्ही भाजप आमदारांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत महिलांचे लैगिंक शोषण करणारा भोंदू अशोक खरात, रविंद्र एरंडे तसेच धर्मांतर प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे, पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले व पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची शनिवारी भेट घेतली व निवेदन दिलं. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार, मनपा गटनेते ॲड. शाम बडोदे, भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस सुनील देसाई यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत हिंदू महिला व मुलींवर लैगिंक अत्याचार आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. कंपनीतील मुस्लीम मुलांकडून हिंदू मुलींचा विचित्र पद्धतीने छळ करण्यात आला. हिंदू महिलांवर अत्याचार करणे, नमाज पठणाची सक्ती करणे, इच्छेविरोधात मांसाहार खायला लावणे, विशष्ट पेहराव करायला लावणे, तसेच एका तरुणाचे धर्मांतरण असे धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याआधी भोंदू अशोक खरात व तथाकथित पत्रकार रविंद्र एरंडे यांनी महिलांचे लैगिंक शोषण केल्याचा प्रकार समोर आला. यापार्श्वभूमीवर तीन्ही आमदारांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली व कारवाईची मागणी केली.

Devayani Farande, devendra fadnavis
Nashik Crime : ‘कॉर्पोरेट कंपनीत असं होत राहतं...’ पीडित हिंदू तरुणींनी मेल केला पण एचआरने दुर्लक्ष केलं... तपासात धक्कादायक माहिती उघड

आयुक्तांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना धर्मांतराच्या मुद्द्यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. धर्मांतर करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर चालवावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. तीन्ही आमदारांच्या वतीने ही मागणी असल्याचे आमदार फरांदे यांनी सांगितलं. खरात असो, एरंडे असो की धर्मांतर करणारे असो यांना भरचौकात फाशी द्या अशी मागणी आमदारांनी केली.

तसेच, अन्याय होत असल्यास महिला व तरुणींनी कुठलीही भीती न बाळगता थेट पोलिसांकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन केले. देवाभाऊंचे सरकार महिला सुरक्षेबाबत पूर्णपणे कटिबद्ध आहे, असेही आमदार देवयानी फरांदे यांनी नमूद केलं.

Devayani Farande, devendra fadnavis
Nashik Crime : लंगडत लंगडत बाहेर आला अन् हात जोडत तो 'नारा दिला'.. अत्याचारी रविंद्र एरंडेला नाशिक पोलिसांनी दाखवला हिसका (Video)

'झिरो टॉलरन्स' मोहीम

नाशिकमधील घडलेल्या या प्रकरणांना अधिक गांभीर्याने घेऊन दोषींवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. नाशिकमध्ये महिलांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू करावी तसेच 'झिरो टॉलरन्स' मोहीम राबवून महिलांमध्ये जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी तीन्ही आमदारांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com