

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने सुरुवातीला उमेदवार देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर अर्ज देखील दाखल करण्यात आला. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या क्षणी तो अर्ज माघारी घेण्यात आला. याच काळामध्ये मोठ्या इंटरेस्टिंग घडामोडी घडल्या. त्यामुळे या अर्ज माघारीची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात असल्याचे पाहायला मिळते. याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खुलासा केला असून नेमका कोणाच्या सांगण्यावरून हा अर्ज मागे घेण्यात आला याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये घेतलेली माघार हा महायुतीला पाठिंबा म्हणता येणार नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला म्हणून ही माघार घेतली यात कोणताही तथ्य नाही. अनेक महायुतीच्या नेत्यांनी आम्हाला विनंती केल्यानंतर सहानुभूतीपूर्वक निर्णय घेऊन आम्ही अर्ज माघारी घेतला आहे. मात्र, जेव्हा आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा महायुतीमधील नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी सातत्याने आमच्या मनधरणीचे प्रयत्न केले. हेच आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पुढे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या तलवारी म्यान केलेल्या नाहीत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिलेला नाही. या ठिकाणी 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार असेल, हे आम्ही ठामपणे सांगितले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती विधानसभा निवडणुकीबाबतचा निर्णय महाराष्ट्र पातळीवरती घेण्यात येणार होता. ज्यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्यासाठी गेल्या. तेव्हा देखील त्यांनी हे स्पष्ट केलं की याबाबतचा निर्णय आज सर्वस्वी महाराष्ट्र काँग्रेसचा असेल. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व स्थानिक नेत्यांशी चर्चा करून बारामतीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. असे अर्ज माघारीबाबत सपकाळ यांनी स्पष्टीकरण दिले.
या निवडणुकीच्या निमित्ताने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्यात यावी? यासाठी गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी होती. ही मागणी आता कर्नाटक सरकारने पूर्ण केली आहे. या संदर्भात मी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी चर्चा केली आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रात मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काहीही बोलायला तयार नाहीत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका त्यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.