Mahua Moitra, Nitesh Rane Sarkarnama
देश

Nitesh Rane : महुआ मोईत्रांनंतर कुणाचा नंबर? नितेश राणेंनी ट्विट करत दिले संकेत

Nitesh Rane Indicated Ubt leader : मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द केल्यावर नितेश राणेंचा रोख ठाकरे गटाच्या नेत्याकडे...

सरकारनामा ब्यूरो

भाजप आमदार नितेश राणे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. त्यामुळे आजच्या त्यांच्या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांचे आज (8 डिसेंबर) लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर नितेश राणे यांनी 'सब गटर बंद करो' असे ट्विट केले आहे. यात त्यांनी ठाकरे गटाच्या एका नेत्याचेही नाव घेतले आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करताना 'आता मोईत्रा, संजय राऊत नंतर?' असे लिहून पुढे 'सब गटर बंद कर दो...' आणि त्यापुढे 'स्वच्छ भारत अभियान' असे लिहिले आहे. म्हणजेच त्यांनी महुआ मोईत्रा आणि संजय राऊत यांचा उल्लेख 'गटर' असा केला आहे. त्यामुळे यावर जोरदार प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्यावर पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात (Cash for Query) संसदेच्या शिस्तपालन समितीने लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस केली होती. या अहवालाची तातडीने अंमलबजावणी करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आवाजी मतदान घेतले आणि मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याच्या शिफारसीवर शिक्कामोर्तब केले.

महुआ मोईत्रा यांच्यावर लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून दोन कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप झाला होता. भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची संसदेच्या शिस्तपालन समितीने चौकशी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी वरील ट्विट केले. ज्याप्रमाणे महुआ मोईत्रा यांचे सदस्यत्व रद्द झाले तसे संजय राऊत यांचेही सदस्यत्व रद्द व्हावे, अशी अपेक्षा नितेश राणे या ट्विटमधून व्यक्त केली आहे. एवढेच नाही तर पुढचा नंतर राऊतांचा असेल, असेही संकेत त्यांनी यातून दिले आहेत.

(Edited by - Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT