Mahua Moitra : महुआ मोईत्रा यांना मोठा धक्का; अखेर लोकसभेची खासदारकी रद्द

Lok Sabha : पैसे घेऊन प्रश्न विचारल्याचे प्रकरण भोवले.
Mahua Moitra
Mahua MoitraSarkarnama
Published on
Updated on

Cash for Query : पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांना मोठा धक्का बसला आहे. शिस्तपालन समितीचा अहवाल सादर केल्यानंतर त्यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आवाजी मतदान घेत मोईत्रा यांची खासदारकी रद्दवर शिक्कामोर्तब केले.

महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी उद्योजक दर्शन हिरानंदानी यांच्याडून लाच म्हणून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करून शिस्तपालन समितीने शुक्रवारी दुपारी बारा वाजता लोकसभेत सुमारे ५०० पानांचा अहवाल सादर केला होता.

Mahua Moitra
BJP : खासदारकी गेली, आता घरे खाली करा; भाजपच्या ‘त्या’ नेत्यांना नोटीस

अहवालामध्ये मोईत्रा यांच्या कृतीवर गंभीर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यांची कृती अनैतिक आणि संसदीय सदस्य म्हणून अयोग्य होती. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली होती. अहवाल लोकसभेत सादर केल्यानंतर त्यावर विरोधकांनी मोठा गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधकांनी मोईत्रा यांना या प्रकरणी आपली बाजू मांडू देण्याची मागणी केली. पण अध्यक्ष बिर्ला यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांना लोकसभेची खासदारकी रद्द करण्याचा प्रस्ताव सरकारतर्फे मांडला. आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर झाला.

(Edited By - Rajanand More)

Mahua Moitra
Lok Sabha : ‘त्यांनी वस्त्रहरण सुरू केलंय, आता महाभारत..!’ महुआ मोईत्रा प्रकरणी मोठी घडामोड

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com