Chhagan Bhujbal & Dada Bhuse Sarkarnama
देश

Malegaon Blast Case Verdict: स्फोटावेळी नेमकं काय घडलं होतं? तत्कालीन पालकमंत्री भुजबळ अन् आमदार भुसेंनी सांगितलं; म्हणाले, शिवसेनेनं...

Malegaon Blast Case Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए कोर्टानं आज निकाल दिला. यामध्ये सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली आहे.

Amit Ujagare

Malegaon Blast Case Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष एनआयए कोर्टानं आज निकाल दिला. यामध्ये सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी सुटका करण्यात आली आहे. या निकालावर नाशिकचे तत्कालीन पालकमंत्री आणि मालेगावचे आमदार दादा भुसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या दोघांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊयात.

भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निकालावर तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, "या बॉम्बस्फोटात जखमी झाले होते मृत्यू झाले होते त्यावेळी मी पण त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी पालकमंत्री असेल मी नाशिकचा. पण एक आहे की जे आज सुटलेले आहेत ते अनेक वर्षे जेलमध्ये होते. म्हणजे अनेक वर्षांची त्यांना सजा झालेलीच आहे. पण ते आज सुटले तरी त्यांनी शिक्षा भोगली असंच झालंय ना?

दादा भुसेंची प्रतिक्रिया

तत्कालीन मालेगावचे आमदार आणि सध्या मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले, "गेल्या काही वर्षांपासून भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद हे शब्द काँग्रेसच्या मार्फत स्पॉन्सर्ड केले जात होते, पण या न्याय निवाड्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली ही एक चपराक आहे. त्यामुळं न्यायालयाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. ज्यानं कोणी ते दुष्कर्म केलेलं आहे, त्या मूळ लोकांना शोधणं आणि त्यांना कायद्याप्रमाणं शिक्षा करणं गरजेचं आहे"

"ही वस्तुस्थिती आहे की, या घटनेतील पीडित कुटुंबातील काही लोक जखमी झाले होते आणि काहींचं निधनही झालं होतं. मी आपल्या माहिती करीता सांगू इच्छितो की ज्या दिवशी या दुर्देवी घटना झाल्या. जेव्हा मालेगावला जखमी लोक रुग्णालयात दाखल केले जात होते, तेव्हा त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणं त्यासोबतच स्वतः रक्त देऊन त्या पेशंटला मदत करण्याचं काम मालेगावच्या शिवसेनेनं आणि अनेक हिंदुत्ववाद्यांनी केलं होतं"

कोर्टाचा निकाल काय?

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगाव शहरातील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ६ जणांचा मृत्यू आणि १०० हून अधिक जण जखमी झाले होते. एका स्कूटरमध्ये आरडीएक्सच्या मदतीनं हा स्फोट घडवून आणण्यात आला होता. या प्रकरणात हिंदुत्वादी संघटनांचे कार्यकर्त्यांविरोधात खटला चालला होता. एटीएस आणि नंतर एनआयएनं या खटल्याचा तपास केला होता. या प्रकरणावर विशेष एनआयए कोर्टानं आज निकाल दिला. आपल्या निकालात कोर्टानं साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर चतुर्वेदी, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी यांच्यासह इतर सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT