Malegaon Blast Verdict : NIA चे सगळे दावे खोडून काढले; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाची कोर्टाकडून चिरफाड, 'या' कारणाने साध्वी, पुरोहित निर्दोष सुटले!

Malegaon Blast NIA Court : साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या स्फोटासाठी वापरलेल्या दुचाकीच्या मालक आहेत,ती दुचाकी त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीची आहे, असे पुरावे सरकार सादर करू शकले नसल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवले.
Sadhvi Pradnya Singh
Sadhvi Pradnya SinghSarkarnama
Published on
Updated on

Malegaon Blast Verdict News : 2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष NIA न्यायालयाने सर्व सातही आरोपींना निर्दोष मुक्त केलं. यामध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल श्रीकांत प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे. निकालात न्यायालयाने तपासातील गंभीर त्रुटी, अपुरे पुरावे आणि प्रक्रिया दोषांवर निरीक्षणं नोंदवत केवळ संशयाच्या आधारावर दोष सिद्ध करता येत नाही, असे म्हटले.

कोर्टाने ठळक निरीक्षण नोंदवताना म्हटले की, कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएसक्स पुरवल्याचा किंवा त्यांनी आणल्याचा कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. तसेच घटनास्थळी अभिनव भारत संघटनेमध्ये ते असले आणि त्या संस्थेच्या पैशांचा वापर त्यांनी वैयक्तिक केला असेल तरी देखील ते पैसे या घटनेमध्ये वापरल्याचा पुरावा नाही.

मालेगावच्या ज्या भिक्कू चौकात बाॅम्बस्फोट झाला होता तेथे घटनास्थळी झालेला पंचनामा नियमानुसार व प्रक्रियेतून झाला नव्हता. तपासात घटनास्थळावरून घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंवरून आरोपींचे हाताचे ठसे घेण्यात आले नव्हते. स्कुटरमध्येच स्फोट झाला हे सरकारी वकील सिद्ध करण्यात अपयश ठरलेचे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले.

Sadhvi Pradnya Singh
Malegaon blast verdict : मोठी बातमी ! भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंहांसह सर्वच आरोपी निर्दोष : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात NIA तपासावर प्रश्नचिन्ह

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या स्फोटासाठी वापरलेल्या दुचाकीच्या मालक आहेत,ती दुचाकी त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीची आहे, असे पुरावे सरकार सादर करू शकले नाही. तसेच त्या गाडीचा चॅसी नंबरच रिकव्हर झाला नव्हता, त्यामुळे मालकीची खात्री झाली नाही,असे देखील न्यायालयाने म्हटले

प्रारंभी आरोपींवर 'मकोका' लावण्यात आला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला. त्यामुळे घेतलेल्या साक्षींना अर्थ राहत नाही. तसेच आरोपींवर लावण्यात आलेला युएपीए दोषपूर्ण होती. त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट केलं की, युएपीए लागू होत नाही.

Sadhvi Pradnya Singh
Prithviraj Chavan: कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरेंवर कारवाई झाली, मग मोदींवर का नाही?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com