Portrait of Tipu Sultan displayed amid political controversy in Malegaon, sparking debate across Maharashtra over historical legacy and political statements. Sarkarnama
देश

Tipu Sultan controversy : "टिपू सुलतानच्या अंगठीवर राम, त्याने सावरकरांसारखं इंग्रजांना लव्हलेटर लिहिली नाहीत..."; फोटोच्या वादावरून ओवैसींनी भाजपला डिवचलं

Asaduddin Owaisi On Tipu Sultan controversy : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली. तर पुण्यात भाजपकडून सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील या टिपू सुलतानच्या वादात आता एमआयएमचे नेते तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे.

Jagdish Patil

Tipu Sultan Controversy : मालेगाव महापालिकेत उपमहापौरांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्यावरून महाराष्ट्रात राजकीय वादाला सुरूवात झाली आहे. हा वाद सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

सपकाळांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हर्षवर्धन सपकाळांवर टीका केली. तर पुण्यात भाजपकडून सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील या वादात आता एमआयएमचे नेते तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी उडी घेतली आहे.

खासदार ओवैसी यांनी टिपू सुलतान प्रकरणावर भाष्य करताना स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली आहे. त्यामुळे आता आणखी नवा वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. टिपू सुलतान प्रकरणावर भाष्य करताना ओवैसी म्हणाले, "टिपू सुलतान इंग्रजांशी लढताना शहीद झाला. टिपू सुलतानने तुरुंगात बसून तुमच्या वीर सावरकरांसारखं इंग्रजांना लव्हलेटर लिहिली नाहीत. तर त्याने तलवार उचलली आणि इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र करण्यासाठीच्या लढाईत शहीद झाला."

तर यावेळी त्यांनी टिपू सुलतानकडे जी सोन्याची अंगठी होती, त्या अंगठीवर राम लिहिलेलं होतं, असं म्हटलं आहे. शिवाय त्या अंगठीचा २०१४ मध्ये लिलाव देखील झालाय आता ही गोष्ट खोटी आहे का? असा सवाल करत डॉ.अब्दुल कलामांनी त्यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ या पुस्तकात 'रॉकेट टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण टिपू सुलतानच्या स्वप्नांना पूर्ण करत आहोत', असं लिहिलं आहे.

हा दाखला देत 'तुमच्यासाठी आणि आमच्यासाठीही कलाम आदर्श आहेत. मग त्यांचं तरी ऐकलं पाहिजे', असं ओवैसी म्हणाले. दरम्यान, तुम्ही महात्मा गांधींना मानता मग त्यांनी एका मासिकात टिपू सुलतान हिंदूमुस्लिम ऐक्याचे प्रतीक असल्याचं लिहिलं आहे. मग तुम्ही आता महात्मा गांधींना खोटं ठरवणार का? असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ओवैसींच्या या वक्तव्यावर आता भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT