Mumbai News, 15 Feb : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एसीबीने छापा टाकत लिपिक राजू ढेरिंगे याला 35 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. या प्रकणामुळे नरहरी झिरवाळ चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
विरोधकांकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता झिरवाळ यांनी सामान्य प्रशासन विभागाला पत्र लिहित लिपिक राजू ढेरिंगे याला पुन्हा त्याच्या मूळ विभागात पाठविण्याची मागणी केली आहे.
शिवाय ढेरिंगे याच्याविरोधात झालेल्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत झालेल्या कारवाईची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमुळे निलंबित झालेला मेडिकलचा परवाना पुन्हा मिळवून देण्यासाठी राजू ढेरिंगे याने 35 हजारांची लाच मागितली होती. ही लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्री झिरवळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातच सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडलं होतं.
या घटनेनंतर झिरवाळ यांनी राजू ढेरंग हे लिपिक म्हणून कार्यरत होते. सुनावणीसंबंधी कागदपत्रे तयार करण्याचे काम त्यांच्याकडे होते. ते मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून, उसनवारीवर या विभागात नियुक्त करण्यात आल्याचं सांगितलं होतं. शिवाय त्याने केलेल्या गैरप्रकाराला कुठेही पाठिशी घातले जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
शिवाय जर या भ्रष्टाचाराचे धागेदोरे माझ्यापर्यंत येत असल्याचे सिद्ध झाले, तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे. या प्रकरणाशी माझा थेट संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास मी राजीनामा देईन, असंही झिरवाळ यांनी म्हटलं होतं. अशातच आता त्यांनी राजू ढेरिंगे याला पुन्हा त्याच्या मूळ विभागात पाठविण्याचे पत्र सामान्य प्रशासन विभागाला लिहिलं आहे. त्यामुळे आता सामान्य प्रशासन विभाग यावर नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.