Delhi : राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकड (Jagdeep Dhankar) यांच्या मिमिक्रीच्या व्हिडिओनंतर वाद संपण्याचे नावच घेत नाही. हा व्हिडिओ म्हणजे आपल्या जातीचा, शेतकऱ्यांचा अपमान असल्याची तिखट प्रतिक्रिया धनकड यांनी दिली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनकड यांना फोन करत मी २० वर्षांपासून शिव्या खात असल्याचे सांगत संयम ठेवण्याचा सल्ला दिला. मात्र, आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'मी दलित आहे म्हणून राज्यसभेत बोलू दिले जात नाही असे मी म्हणू शकतो', असे सांगत राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकड यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला.
जगदीप धनकड यांची मिमिक्री करणारा संसदेच्या पायऱ्यांवरील खासदार कल्याण बॅनर्जी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओनंतर जगदीप धनकड यांनी नाराजी व्यक्त करत माझा जो अपमान झाला आहे तो माझ्या जातीचा, शेतकऱ्यांचा अपमान आहे, अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. त्यावर राज्यसभा अध्यक्षांनी सर्वांना सांभाळून घ्यायला हवे, असे खर्गे म्हणाले.
मी दलित नेता असल्यामुळे मला राज्यसभेत बोलून दिलं जात नाही , असे मी म्हणू शकतो. आतमध्ये जातीपातीचा उल्लेख करून बाहेर लोकांना भडकावणे योग्य नाही, असा टोला देखील खर्गे यांनी लगावला. खासदार कल्याण बॅनर्जी हे राज्यसभा अध्यक्ष धनकड यांची मिमिक्री करत असताना राहुल गांधी त्यांचा व्हिडिओ काढत होते. राहुल गांधींच्या कृत्यावर भाजपने नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कठोर शब्दांमध्ये टीका केली. महाराष्ट्र भाजपकडून तर राहुल गांधी यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत होते.
राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात मिळून 143 खासदार निलंबित झाले आहेत. खासदारांच्या या निलंबन सत्रामुळे विरोधीपक्षाने भाजपवर टRका केली आहे. 'इंडिया' आघाडीतल्या खासदारांनी गुरुवारी संसद ते विजय चौकापर्यंत पदयात्रा काढली. लोकसभेतील 97 आणि राज्यसभेतील 46 खासदारांना या अधिवेशनात निलंबित करण्यात आले आहे.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.