Mallikarjun Kharge Sarkarnama
देश

Mallikarjun Kharge news : धक्कादायक : मल्लिकार्जून खर्गेंच्या भाषणानंतर स्टेजचं शुध्दीकरण; भाजपवर आरोप, संसदेत जोरदार खडाजंगी

Haldwani purification row, BJP Congress clash : मल्लिकार्जून खर्गेंच्या हलदानी येथील सभेनंतर स्टेजवर शुध्दीकरण यज्ञ; दलितांचा अपमान, अस्पृश्यतेच्या मुद्द्यावर संसदेत भाजप-काँग्रेस आमनेसामने.

Rajanand More

Rajya Sabha update : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी गुरूवारी राज्यसभेत धक्कादायक बाब उजेडात आणली. उत्तराखंडमधील हलदानी येथील रामलीला मैदानावर ८ ऑगस्टला खर्गे यांची सभा झाली होती. या सभेत खर्गेंनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. या सभेनंतर सभेच्या ठिकाणी एक शुध्दीकरण यज्ञ करण्यात आला होता. त्यावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

राज्यसभेत गुरूवारी या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते असलेल्या खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मी कधी आपण अनुसूचित जातीतील असल्याचा मुद्दा बनवत नाही. पण मी केलेल्या भाषणाच्या स्टेजचे शुध्दीकरण करून माझा अपमान करण्यात आला. भाषणादरम्यान मी कोणताही समाज किंवा धर्माचा उल्लेख केला नव्हता. लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर बोललो होतो.

भाषण झाल्यानंतर बुधवारी भाजपच्या लोकांनी यज्ञ करून स्टेजचे शुध्दीकरण केले, असा दावा खर्गे यांनी केला. त्यावर सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी लगेचच या घटनेची चौकशी केली जाईल, असे जाहीर केले. भाजप अशा घटनांचे समर्थन करत नाही. मी तुमची भावना समजू शकतो. केवळ काँग्रेसच नाही तर आमच्यासाठीही हे दुखद आहे. भाजपने हे केले असे वारंवार म्हणून नका.

खर्गे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधित लोकांना अटक करावी, अशी आमची मागणी असल्याचे सांगितले. मीडियाशी बोलताना खर्गे म्हणाले, या देशात दलितांसाठी जागा आहे की नाही, हे मी आधीही म्हटले आहे. तिथे यज्ञ करण्याची काय गरज होती? रामलीला मैदानावर प्रत्येक पक्षाचे लोक सभा घेतात. पण तिथे जे झाले ते हिंदू धर्माविरोधात आहे. यातून हे स्पष्ट होते की, भाजपचे लोक देशाला जातींमध्ये विभागून वाद निर्माण करण्याचे काम करत आहे.

राज्यसभेच्या सभापतींनी या घटनेची दखल घेत नाराजी व्यक्त केली. अस्पृश्यता हे पाप नसेल तर मग या जगात कोणतेच पाप नाही. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करत आहोत. आपण सर्वच शुध्द आहोत. ज्यांनी असे केले आहे, त्यांना ताब्यात घ्यायला हवे. यामध्ये कुणाचेही दुमत नाही, असे सभापती म्हणाले. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधला. भाजप, आरएसएसच्या मानसिकतेचे हे प्रदर्शन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचा निषेध करायला हवा, असे त्या म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT