Parliament Session : घमासान सुरू असतानाच लोकसभेत PM मोदी-शाह अन् राहुल गांधी समोरासमोर; अध्यक्षांकडून अनिश्चित काळासाठी कामकाज स्थगित

PM Narendra Modi, Amit Shah, Rahul Gandhi : विद्यार्थी आंदोलन, लाठीचार्ज आणि राम मंदिर दानचोरीच्या मुद्द्यांवरून सरकार-विरोधकांमध्ये तणाव; शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी, अमित शाह सभागृहात.
Rahul Gandhi, Amit Shah, PM Narendra Modi
Rahul Gandhi, Amit Shah, PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha uproar : संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज, राम मंदिरातील दानचोरी आदी मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी सरकारला घेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दोन्ही सभागृहातील अनुपस्थितीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सातत्याने आक्रमक भूमिका मांडत आहेत.

अधिवेशनाचा गुरूवारी अखेरचा दिवस असल्याने पंतप्रधान मोदी आणि शाह सभागृहात येणार का, याबाबत उत्सुकता वाढली होती. शाह यांनी आपण विरोधकांना उत्तर द्यायला तयार असल्याचे बुधवारीच स्पष्ट केले होते. पण लाठीचार्ज करण्यासाठी कुणी आदेश दिले, याचे उत्तर द्यावे, अशी मागणी करत राहुल गांधी यांनी शाह यांचे आव्हान धुडकावले होते. त्यामुळे गुरूवारी अखेरच्या दिवशी लोकसभेत कोणत्या घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाह, राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला सभागृहात येण्याआधीपासूनच विरोधकांकडून घोषणाबाजी सुरू होती. सभागृहात अध्यक्ष आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम् साठी उभे राहण्यास सांगितले. वंदे मातरम् झाल्यानंतर पुन्हा विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांचा रोख अमित शहांकडे होता. पण अध्यक्षांनी काही सेकंदातच लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केले.

Rahul Gandhi, Amit Shah, PM Narendra Modi
ट्रेनी IPS अधिकाऱ्याचा पहिल्याच पोस्टिंगमध्ये कारनामा; थेट 1 कोटींची लाच, कोण आहेत राहुल बन्सल?

अखेरच्या दिवसाच्या सुरूवातीलाच कामकाज स्थगित करण्यात आले. अधिवेशनाचा पहिला दिवस गोंधळात सुरू झाला होता, आता शेवटच्या दिवशीही गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे सभागृहात काही तासच कामकाज होऊ शकले. या गोंधळातही सरकारने एफसीआरए हे महत्वाचे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर करत ते संयुक्त संसदीय समितीकडे पाठविण्यास मंजुरी मिळविली. विरोधकांनी हे विधेयक सादर करण्यासच प्रचंड विरोध केला होता. पण या गोंधळात सरकारने संधी साधत ते जेपीसीकडे पाठविले.

Rahul Gandhi, Amit Shah, PM Narendra Modi
Shiv Sena symbol case : एकनाथ शिंदेंनी टाकला डाव, सिब्बलांचा प्रतिडाव; शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला 'त्या' मुद्द्यांभोवतीच फिरणार...

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनानंतर सत्ताधारी खासदारही आक्रमक झाले होते. त्यामुळे मागील दोन-तीन दिवस संसदेच्या आवारात दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू होती. सत्ताधाऱ्यांकडून प्रामुख्याने राहुल गांधींना टार्गेट केले जात होते. तर विरोधक थेट अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसत होते. पण सरकारने विरोधकांना अखेरपर्यंत जुमानले नाही. पंतप्रधान मोदी आणि शाह शेवटच्या दिवशी सभागृहात आले अन् काही सेकंदात कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. त्यांच्यावर बोलण्याची संधीच विरोधकांना मिळाली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com