West Bengal election 2026 news : राजकीय नेते म्हटले की बहुतेकांच्या संपत्तीत वर्षागणिक वाढच होत जाते. अनेक वर्षे आमदार, खासदार, केंद्र-राज्य सरकारमध्ये मंत्री, मुख्यमंत्री असलेल्या नेत्यांची उड्डाणे तर कोटींच्या घरात असतात. पण त्याला काही नेते अपवाद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यापैकीच एक नाव. पण त्यांनाही याबाबतची मागे टाकले आहे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीमध्ये २०१४ नंतरचा विचार केला तर वाढच होत गेली आहे. पण ममतादीदींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यांच्या संपत्तीमध्ये चक्क घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ममतादीदींनी बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी आपल्याकडील संपत्तीची माहिती दिली आहे.
संपत्ती १.३ लाखांनी घटली
ममता बॅनर्जी यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेल्या संपतीनुसार, त्यांची एकूण जंगम मालमत्ता १५.३७ लाख रुपये एवढी आहे. २०२१ च्या निवडणुकीवेळी त्यांनी आपली संपत्ती १६.७२ एवढी दाखविली होती. मागील पाच वर्षांत त्यांच्या जंगम मालमत्तेत १.३ लाखांची घट झाल्याचे समोर आले आहे. सध्याची त्यांच्याकडील संपत्तीचा सर्वाधिक हिस्सा बँकेत जमा आहे. बँकांमध्ये १२.७ लाख रुपये आहेत.
ममता बॅनर्जी यांच्याकडे ७५ हजार ७०० रुपयांची रोख रक्कम आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यामध्ये ६ हजार ४४५ रुपयांची वाढ झाली आहे. ममतादीदींच्या नावावर कोणतीही स्थावर मालमत्ता, वाहन नाही. त्यांच्या नावावर एक रुपयाचेही कर्ज नाही. तसेच त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.
अत्यंत साधे राहणीमान असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नावावर ना घर आहे ना जमीन. त्या वडिलोपार्जित घरामध्ये राहतात. राजकीय जीवनात इतके वर्षे घालवूनही ममतादीदींच्या संपत्तीत घटच झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पश्चिम बंगालसारख्या राज्यात त्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत. काही वर्षांपूर्वी त्या केंद्रीय मंत्री होत्या. पण त्यानंतरही त्यांच्या अत्यंत साध्या राहणीमानामुळे त्यांनी बंगालमधील जनतेच्या मनात घर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.