US Iran tensions latest news : अमेरिका-इस्त्रायलकडून इराणवर सुरू करण्यात आलेले हल्ले अखेर आज थांबले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांची शस्त्रसंधी केल्याचे जाहीर केले. त्यामुळे संपूर्ण जगाचा जीव भांड्यात पडला. मात्र, इराणने या शस्त्रसंधीच्या निमित्ताने दहा अटी ठेवल्या आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियात पोस्ट करत शस्त्रसंधीची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी आता इराणसाठी खास मेसेज दिला आहे. शस्त्रसंधीनंतरर काही तासांतच सोशल मीडियात पोस्ट करत इराणला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे शस्त्रसंधीच्या काही तास आधी ट्रम्प यांनी इराणविषयी अभद्र भाषेचा वापर करत निर्वाणीचा इशारा दिला होता.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
शस्त्रसंधीनंतर ट्रम्प यांनी सोशल मीडियात पोस्ट करत इराणला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. जागतिक शांततेसाठी हा एक मोठा दिवस असल्याचे सांगत त्यांनी म्हटले आहे की, Strait of Hormuz मधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अमेरिका मदत करेल. पुढील काळात अनेक सकारात्मक घडामोडी घडणार आहेत. मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती होईल.
इराण पुन्हा पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू करू शकते. त्यासाठी आम्ही सज्ज राहू. सर्व काही व्यवस्थित पार पडत आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही सोबत असू, यात यश मिळेल, असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत अनुभवत असलेले सुवर्णयुग मध्य पुर्वेतही अनुभवायला मिळेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शस्त्रसंधीची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले होते की, इराणवर दोन आठवड्यांसाठी हल्ले स्थगित करण्यासाठी सहमती झाली आहे. ही द्विपक्षीय शस्त्रसंधी असेल. इराणही होर्मूझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्यास तयार आहे. इराणकडून आम्हाला दहा मुद्द्यांवर प्रस्ताव मिळाला आहे. त्यावर चर्चा होईल. सर्व वादग्रस्त मुद्द्यांवर अमेरिका आणि इराणमध्ये सहमती झाल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले होते.
इराणने घातलेल्या अटींमध्ये हल्ले पूर्णपणे थांबविणे, सामुद्रधुनीवर पूर्णपणे इराणचे नियंत्रण, यूरेनियमच्या वापरावर स्वीकार करणे, सर्व निर्बंध हटविणे, इराणला भरपाई देणे, देशातून अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांची माघार, लेबनान सर्वठिकाणी युध्द समाप्ती आदी मुद्द्यांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.