West Bengal Assembly Election update : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून रविवार दुपारी चार वाजता देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार आहे. ही घोषणा होताच या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होईल. या काळात सरकारला कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत. या पाच राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे.
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत असून पुन्हा सरकार बनविण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कंबर कसली आहे. आचारसंहिता लागू होण्यासाठी काही मिनिटे बाकी असतानाच त्यांच्या सरकारने दोन महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ममतादीदींनी सरकारी नोकरदार तसेच पेन्शनधारकांना पुजारी आणि मुएझिन यांना मोठा दिलासा दिला आहे.
मानधनात ५०० रुपयांची वाढ
पुजारी आणि मुएझिन यांच्या मानधनात दरमहा ५० रुपयांनी वाढ करण्यात आल्याची घोषणा ममतादीदींनी केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियातून माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपल्या समाजाचे आध्यात्मिक आणि सामाजिक जीवन टिकवून ठेवणारे पुजारी आणि मुएझिन यांच्या मासिक मानधनात ५०० रुपयांची ढ जाहीर करताना मला आनंद होत आहे. या सुधारणेसह, त्यांना आता दरमहा दोन हजार रुपये मिळतील.
पुजारी आणि मुएझिन यांनी सादर केलेले सर्व नवीन अर्ज देखील राज्य सरकारने मंजूर केले असल्याची माहिती ममतांनी दिली आहे. प्रत्येक समाज आणि प्रत्येक परंपरेचा सन्मान आणि सशक्तीकरण होईल, असे वातावरण आपण निर्माण करत असल्याचा अभिमान आहे. आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशांच्या संरक्षकांना त्यांच्या हक्काची ओळख आणि सहकार्य मिळावे, असा आमचा प्रयत्न सुरू असल्याचेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
महागाई भत्ता मिळणार
ममता बॅनर्जी यांनी प्रलंबित महागाई भत्ता देण्याची घोषणाही केली आहे. सर्व सरकारी कर्मचारी व पेन्शनधारक, तसेच लाखो शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचप्रमाणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून महागाई भत्त्यातील फरक मिळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वीच महागाई भत्त्याच्या (डीए) वादावर महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. २००८ ते २०१९ पर्यंतच्या महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. सुमारे २० लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. ममतादीदींनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर महागाई भत्त्याची घोषणा करत राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे.
दरम्यान, बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्य थेट लढत होणार आहे. भाजपकडून सातत्याने बांग्लादेशी घुसखोरांवरून ममतांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. ममता बॅनर्जी या हिंदूविरोधी असल्याचा प्रचार भाजपकडून केला जात आहे. यापार्श्वभूमीवर आज आचारसंहिता लागू होण्याआधीच ममतांनी पुजाऱ्यांसह मुएझिन यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. तसेच निवडणुकीच्या तोंडावर महागाई भत्त्याची घोषणा करत त्यांनी भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फेरण्याचा प्रयत्न केला आहे. हे निर्णय निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.