

Pune News : महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ भाजपच्या रडारवर असल्याचं बोललं जातं. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा आघाडीवर येतो. बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकण्याचा अनेकदा भाजपने प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये यश आलं नाही. त्यामुळे भाजपकडून या लोकसभा मतदारसंघासाठी ऑपरेशन लोटस राबवण्यात येत असल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून सुरू आहेत.
पुणे जिल्हा हा काही दशकांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा गड राहिला आहे. हा गड जिंकण्यासाठी आणि आपली जिल्ह्यामध्ये ताकद वाढवण्याचे दृष्टिकोनातून गेल्या वर्षभरामध्ये भाजपने इतर पक्षातील नेत्यांना आपल्याकडे घेत ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी पुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांना भाजपने आपल्या गोठात घेतलं. त्या पाठोपाठ भोर राजगड मुळशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे देखील भाजपवासी झाल्याचे पाहायला मिळालं. इंदापूर मधून देखील प्रवीण माने यांना भाजपने पक्षप्रवेश दिला.
पक्षप्रवेशाच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या प्रयत्नांना सध्या तरी तितकं यश मिळताना पाहायला मिळत नाही. कारण पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीत १३ पैकी तब्बल १० पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला झेंडा फडकावला आहे. तर एकमेव दौंडची पंचायत समिती भाजपला जिंकता आली आहे.
संग्राम थोपटे यांना पक्षात घेऊन मुळशी, भोर आणि राजगडचा गड सर करण्याचा प्रयत्न भाजपाचा होता. मात्र या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. तर पुरंदर पंचायत समिती देखील संजय जगताप यांना राखता आलेली नाही. त्यासोबतच इंदापूर मध्ये प्रवीण माने यांना देखील आपला करिष्मा दाखवता आलेला नाही.
दरम्यान, मागील पंचायत समिती निवडणुकीमध्ये संग्राम थोपटे हे काँग्रेसमध्ये असताना भोर, वेल्हा आणि मुळशी या तिन्ही पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होतं. यंदा थोपटे भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी भोर आणि मुळशी मध्ये पहिल्यांदाच भाजपला खाते उघडून दिला आहे. भोरमध्ये चार जागा तर मुळशी मध्ये एक जागा भाजपला जिंकता आली आहे. तर पुरंदर मध्ये देखील पहिल्यांदाच भाजपने खातं खोललं असून जगताप यांच्या माध्यमातून दोन जागा जिंकण्यात पक्षाला यश आला आहे. या नेत्यांच्या माध्यमातून भाजपने पुणे जिल्ह्यात आपला अस्तित्व निर्माण केला असला तरी ते अपेक्षीप्रमाणे नसल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे ज्या तीन मोहऱ्यांच्या ताकदीवर भाजप आगामी 2029 बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. ते तिन्ही मोहरे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पहिल्या परीक्षेतच फेल झाले असल्याचे चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.