West Bengal News: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाच्या पराभवानंतर, सुमारे 20 खासदारांनी ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (एनसीपी) मध्ये प्रवेश केला आहे. तसेच या सर्व बंडखोर खासदारांना लोकसभेत तृणमूल काँग्रेसच्या खासदारांपासून वेगळे बसण्यासही लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे. मात्र,आता याच खासदारांबाबत मोठी अपडेट समोर येत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरु झाली असल्याची चर्चा आहे. तसेच हे खासदार तृणमूल काँग्रेसमध्ये परतणार असल्याच्याही चर्चा सुरू आहे. यामुळे पश्चिम बंगालसह देशाच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. यावर आता तृणमूल काँग्रेस(ममता बॅनर्जी) पक्षाचे खासदार बंडखोर खासदार पुन्हा पक्षात परतणार असल्याच्या चर्चांवर तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी नवा राजकीय बॉम्ब टाकला आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी सोशल मीडियावरील X प्लॅट फॉर्मवर केलेल्या पोस्टनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये "मी त्यांच्यापैकी(बंडखोर खासदार) काहींशी बोललो आहे. भाजपमध्ये ते अस्वस्थ असल्याचं दावा केला आहे.
कदाचित दबाव आणि दडपशाहीमुळे त्यांना तिथे राहावे लागत असेल. ते परत आले तर ती चांगली गोष्ट असेल. याबाबत मी आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केल्याचंही तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तर दुसरीकडे बंडखोर खासदारांच्या अंतर्गत वादाच्या चर्चांवर एनसीपीआय पार्टीनं एक महत्वपूर्ण निवेदन प्रसिद्ध केलं आहे. या निवेदनात त्यांनी आमच्या हे निदर्शनास आलं आहे की, काही माध्यम संस्था आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अशा बातम्या देत आहेत की, एनसीपीआयच्या खासदारांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. पण या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि कुठल्याही तथ्यांवर आधारित नसल्याचं म्हटलं आहे.
तसेच याप्रकारच्या दिशाभूल करणाऱ्या माहितीचा पक्षाकडून इन्कार अन् निषेध केला जात आहे. कोणीही पुष्टी न केलेल्या बातम्या, अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ती पसरवूही नयेत,अशाप्रकारचं आवाहनही करण्यात आलं आहे. याचवेळी अधिकृत माहिती आणि घोषणांसाठी फक्त NCPIच्या अधिकृत संवाद माध्यमावरच विश्वास ठेवण्यात यावं असंही निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे.
एनसीपीआयचे सर्व खासदार हे अजूनही एकजुटीनं काम करत असल्याचा दावा या निवेदनात करण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या विकासासाठी आणि तिथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी व देशाच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचंही एनसीपीआय पक्षाच्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (NDA) विकसित भारत 2047 चं व्हिजन पूर्ण करण्यासाठी काम करत आहोत, असंही NCPI नं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. तृणमूलच्या खासदारांबाबत यामुळे नाराजी,मतभेदाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी नवा बॉम्ब फोडला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.