Mamata Banerjee: पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर आणि पाठोपाठ तृणमूलमध्ये उभी फूट पडल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा दबदबा संपला असल्याची चर्चा नेहमी होत असते. पण नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं होतं. त्यानंतर आता पोटनिवडणूक लढवून पुन्हा विधानसभेत येण्यासाठी त्यांनी पक्की फिल्डिंग लावली आहे. विशेष म्हणजे तृणमूलच्या बंडखोर गटाचे नेते ऋतभ्रत बॅनर्जी यांनी माघार घेण्याची मोठी घोषणाही केली आहे.
पश्चिम बंगालमध्ये दोन जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यातील ७०-रेजीनगर आणि २१०-नंदीग्राम या दोन जागेवर ही निवडणूक होणार आहे. रेजीनगरमधून हुंमायू कबीर यांनी राजीनामा दिला होता. तर नंदीग्राममधून सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी दोन जागांवरुन विधानसभा निवडणूक लढवली होती. यांपैकी एक नंदीग्राम आणि दुसरा भवानीपूर या दोन मतदारसंघातून ते आमदार बनले होते. यांपैकी नंदीग्राम या जागेवर त्यांनी ममता बॅनर्जींना धोबीपछाड दिली होती. पण निवडणुकीनंतर भवानीपूरमधून सुवेंदू अधिकारी यांनी आपली आमदारकी कायम ठेवली असून नंदीग्रामची जागेवरुन राजीनामा दिला आहे. सुवेंदू अधिकारी सध्या पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहेत.
दरम्यान, नंदीग्राम हा ममता बॅनर्जी यांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळं या जागेवरुन नुकताच त्यांचा पराभव झालेला असला तरी या पराभवामागे SIR प्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावं चुकीच्या पद्धतीनं वगळल्यानं त्याचा आपल्याला फटका बसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. त्यामुळं आता नंदीग्राममध्ये लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
दुसरीकडं तृणमूल काँग्रेसचा फुटीर गटानं ज्याचं नेतृत्व ऋतब्रत बॅनर्जी यांनी देखील ही पोटनिवडणूक लढवण्याची संपूर्ण तयारी केली आहे. यासाठी त्यांनी या दोन्ही पोटनिवडणुकीच्या जागांसाठी आपले उमेदवारही जवळपास निश्चित केले असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. पण हे सांगताना त्यांनी एक मोठी घोषणाही करुन टाकली. ही घोषणा म्हणजे जर ममता बॅनर्जी पोटनिवडणूक लढवणार असतील तर त्यांच्याविरोधात आमच्या गटाकडून उमेदवार दिला जाणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं की, ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत आलं पाहिजे आणि त्यांनी नंदीग्राममधूनच विधानसभेत यावं अशी आमची इच्छा आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक होणार असतानाच निवडणूक आयोगाकडून दोन्ही पक्षांच्या दाव्यांवर सुनावणी सुरु आहे. ऋतब्रता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, ममता बॅनर्जी यांनी प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. पण त्यांनी यापूर्वी देखील पोटनिवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेत प्रवेश केला होता. त्याचबरोबर आमच्या गटाचा आगामी पोटनिवडणूक विजय होईल अशा विश्वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.