Mamata Banerjee Sarkarnama
देश

TMC Protest News: विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावली,ममता बॅनर्जींना मोठा धक्का; 'टीएमसी'चे तब्बल 45 आमदार नाराज?

West Bengal Political News: माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून एका मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. पण या आंदोलनाला टीएमसीचे तब्बल 45 आमदारांनी दांडी मारल्याचं समोर येत आहे.

Deepak Kulkarni

West Bnegal News: नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला. भाजपनं 293 पैकी तब्बल 208 जागा जिंकत ममता बॅनर्जी यांची पंधरा वर्षांची राजवट संपुष्टात आणली होती. याचदरम्यान,सत्ता हातातून गेल्यानंतर तृणमूल काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता समोर येत आहे.

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडून बुधवारी (ता.20 मे) एका मोठ्या आंदोलनाची हाक देण्यात आली होती. पण या आंदोलनाला टीएमसीचे तब्बल 45 आमदारांनी दांडी मारल्याचं समोर येत आहे. यामुळे तृणमूल काँग्रेसच्या गोटात निवडणुकीतील पराभवानंतर सारंकाही आलबेल नसल्याचं दिसून येत आहे.

तृणमूल काँग्रेसच्या या आंदोलनाला गैरहजर राहिलेल्या आमदारांमध्ये मोठी नाराजी असल्याची चर्चा पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. त्याचमुळे या सर्व नाराज आमदारांनी आंदोलनापासून दूर राहणंच पसंत केल्याची माहिती आहे.

तृणमूल काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.19) पक्षाची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसकडून बोलावण्यात आलेली ही पहिलीच मोठी बैठक होती.

टीएमसीच्या काही आमदारांकडून या बैठकीत पक्षाचा विधानसभा निवडणुकीतील पराभव झाल्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलन केल जात नसल्यामुळे तीव्र नाराजी बोलून दाखवली.आगामी काळात टीएमसी नेते आगामी काळात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलने करताना दिसण्याची शक्यता आहे.

तृणमूल काँग्रेसकडून विधानसभा परिसरात धरणं आंदोलन छेडण्यात आलं होतं.हे आंदोलन टीएमसीकडून हिंसाचार आणि फेरीवाल्यांवरील कारवाई विरोधात करण्यात आलं होतं.या आंदोलनात तृणमूलचे शोभनदेव चट्टोपाध्याय,नयना बॅनर्जी या नेत्यांसह जवळपास 35 आमदार हजर होते. पण गंभीर बाब म्हणजे तृणमूलचे विधानसभेतील 80 पैकी 45 आमदारांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं.

यावर शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी आंदोलनातील टीएमसीच्या आमदारांच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,‘आजच्या तृणमूलच्या आंदोलनात आमच्या पक्षाचे 35 आमदार सहभागी झाले होते.तर काही आमदार हे निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची झळ बसलेल्या मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत असल्यानं आजच्या आंदोलनाला उपस्थित राहू शकले नाही.

तसेच काही आमदारांचा मतदारसंघ दूर असल्यानं त्यांना या आंदोलनात सहभागी होता आले नसल्याचं स्पष्टीकरणही चटोपाध्याय यांनी यावेळी दिले. कारण हे आंदोलन आम्ही अवघ्या एका दिवसाच्या नोटिशीवर बोलावण्यात आलं असल्याचंही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT