BJP News: भाजपच्या बड्या नेत्याचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, कुटुंबियांच्या दाव्यांनी खळबळ

Uttar Pradesh Crime News: गेल्या पाच वर्षांपासून चंद्रपाल सिंह हे भाजपशी संबंधित होते आणि त्यांनी गाव बूथ अध्यक्ष म्हणून काम केले होते. राजकीय सहभागासोबतच ते शेतीही सांभाळत होते. घटनेची माहिती मिळताच, अनेक स्थानिक भाजप नेते आणि अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन शोकाकुल कुटुंबाची भेट घेतली.
 BJP
bjpSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशच्या राजकारणातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे भारतीय जनता पक्षाशी संबंधित एका शेतकरी नेत्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. 55 वर्षीय चंद्रपाल सिंह यांचा मृतदेह बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दांडा गोविंदपूर गावापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर एका झाडाला प्लास्टिकच्या दोरीने लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

भाजप नेते चंद्रपाल सिंह मंगळवारी(ता.19) रात्री आपल्या घराशेजारील व्हरांड्यात झोपायला गेले होते. त्याच रात्री उशिरा ते अचानक गायब झाले. सकाळी काही गावकरी शेतात गेले असता, त्यांना त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना तात्काळ देण्यात आली.बिलारी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांकडून सिंह यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तो शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.

चंद्रपाल सिंह यांची हत्या करून नंतर आत्महत्या भासवण्यासाठी त्यांना झाडाला लटकवण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. घटनास्थळाच्या आजूबाजूला विविध ठिकाणी एक मोबाईल फोन, एक काठी आणि मृताचे कपडे विखुरलेले आढळल्याचा दावा मृत नेत्याचा धाकटा भाऊ,वीरपाल सिंह आणि मुलगा,राजेश कुमार यांनी केला आहे. कुटुंबियांच्या मते,सिंह यांच्या विखुरलेल्या वस्तूंवरून तिथे झटापट झाल्याचं दिसून येत आहे.

 BJP
PCMC Mayor Threat: पिंपरी चिंचवडच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी,पोलिसांच्या हेल्पलाईनवरुनच कॉल; आरोपीबाबत धक्कादायक बाब समोर

उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरुवातीला या घटनेचा आत्महत्येच्या अँगलनं तपास सुरू केला होता. मात्र, आता मृताच्या कुटुंबीयांनी चंद्रपाल सिंह यांची हत्या झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिल्यानंतर आता पोलिसांनी हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही अँगलनं तपास सुरू केला आहे.

चंद्रपाल सिंह यांचा कुटुंबियांनी आरोप आहे की, एका ओळखीच्या व्यक्तीने चंद्रपाल सिंह यांना रात्री उशिरा फोन करून बाहेर बोलावले होते. गावप्रमुख राजेंद्र सिंह यांनीही ही घटना संशयास्पद असल्याचे म्हटले असून, यात कट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याच्याशी शेवटचा संपर्क कोणी साधला होता, हे निश्चित करण्यासाठी पोलीस आता मृताच्या मोबाईल फोनच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्सची (CDR) तपासणी करत आहेत.

 BJP
BJP vs NCP news : भाजपला 'दे धक्का', आमदाराच्या घरात फूट; भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पाच वर्षांपासून भाजपशी संबंधित

गेल्या पाच वर्षांपासून चंद्रपाल सिंह हे भाजपशी संबंधित होते आणि त्यांनी गाव बूथ अध्यक्ष म्हणून काम केले होते. राजकीय सहभागासोबतच ते शेतीही सांभाळत होते. घटनेची माहिती मिळताच, अनेक स्थानिक भाजप नेते आणि अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन शोकाकुल कुटुंबाची भेट घेतली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com