Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee : आमदार परतू लागताच ममता बॅनर्जींचा आक्रमक पवित्रा; राजकारणातून संन्यासावर मोठं वक्तव्य

Mamata Banerjee aggressive stance after MLA return : आमदारांच्या घरवापसीनंतर ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. राजकारणातून संन्यास घेण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी काय म्हटलं? जाणून घ्या.

Rashmi Mane

पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्षाला आता नवं वळण मिळालं आहे. काल विधानसभा निवडणुकीनंतर पक्षातील बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अमडांगा मतदारसंघाचे TMC आमदार ‘पीरजादा’ कासिम सिद्दीकी यांनी पुन्हा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. बंडखोर नेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटापासून दूर होत आपण पुन्हा पक्षात परतत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

विशेष म्हणजे, बंडखोर गटात सहभागी झाल्यानंतर अवघ्या 2 महिन्यांतच कासिम सिद्दीकी यांनी आपली भूमिका बदलली आहे. काही कागदपत्रांवर दिशाभूल करून आपली स्वाक्षरी घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित गट ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालीच काम करणार असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्या गटात ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाचा कोणताही उल्लेख नसल्याचं लक्षात आलं, असा दावा सिद्दीकी यांनी केला.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी राजकारणातून संन्यास घेण्याच्या चर्चेलाही स्पष्ट उत्तर दिलं आहे. पश्चिम बंगालची सत्ता गमावल्यानंतरही आपण राजकीय मैदान सोडणार नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. भाजपला राजकीयदृष्ट्या मागे ढकलल्याशिवाय आपली लढाई थांबणार नाही, असा आक्रमक संदेश त्यांनी दिला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, “बीजेपी मला मीटिंग करण्याची परवानगी देत नाही. ज्यांना वाटतं की फक्त मला परवानगी मिळत नाही म्हणून मी राजकारणातून संन्यास घेईन, त्यांचा गैरसमज आहे. भाजपला स्वतः राजकीय निवृत्ती घेण्यास भाग पाडल्याशिवाय आमची लढाई थांबणार नाही.”

ममता बॅनर्जी यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर आरोप केले आहेत. TMC कार्यकर्त्यांवर प्रकरणं दाखल केली जात असून पोलीस भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. त्या म्हणाल्या, “पोलीस TMC कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. SP जिल्हाध्यक्षांसारखे काम करत आहेत, तर IC भाजपच्या ब्लॉक अध्यक्षांसारखे वागत आहेत.”

त्यांनी पुढे दावा केला की, “12,000 ते 14,000 लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही गद्दार आणि लुटारूंच्या मदतीने लोकांना भाजपमध्ये सहभागी होण्यासाठी सांगितलं जात आहे.”

ममता बॅनर्जींच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि TMC आमदारांच्या घरवापसीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT