Shalarth ID Scam : भाजप नेत्याची जामिनासाठी नाशिकच्या न्यायालयात धाव; 160 कोटींच्या घोटाळ्यात सुनावणीची तारीख ठरली

Sanjay Garud Moves Court for Bail : शालार्थ आयडी घोटाळ्यातील संशयित भाजप पदाधिकारी संजय गरुड यांचा रुग्णालयात मुक्काम कायम असून त्यांना आता जामिनासाठी नाशिकरोड न्यायालयात धाव घेतली आहे.
Shalarth ID scam case in Nashik court
Shalarth ID ScamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shalarth ID scam BJP leader: राज्यभर गाजत असलेल्या व शासनाची १६० कोटी रुपयांची फसवणूक झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण संस्था चालक व जळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी संजय गरुड यांनी जामिनासाठी नाशिक रोड अतिरिक्त न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी जामिनासाठी नाशिकरोड न्यायालयात अर्ज दाखल केला असून सुनावणीची तारीख ठरली आहे.

गरुड यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. २८) सुनावणी होणार आहे. याच दिवशी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी आहे.

दरम्यान, गरुड यांनीच सर्वाधिक शालार्थ आयडी प्राप्त केल्याचे तपासातून समोर आलेले आहे. यासह घोटाळ्याच्या तपासात सध्या नाशिक परिक्षेत्रातील शिक्षण विभागातील अनेक अधिकारी -कर्मचाऱ्यांभोवती पोलिसांनी चौकशीचा फास आवळला आहे.

संजय गरुड हे भाजपचे पदाधिकारी असून खानदेशातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या जामनेरच्या शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांना गेल्या २७ जुलैच्या रात्री सोलापूर जिल्ह्यातील फार्महाउसवरून शहर गुन्हे शाखेने अटक केली होती. या कारवाईने खानदेशातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. अनेक शिक्षण संस्थाचालक अटकेच्या भीतीने भूमिगत झाले आहेत.

Shalarth ID scam case in Nashik court
Shalarth ID Scam : धक्कादायक! SIT च्या झाडाझडतीत जळगावच्या तीन शाळा निघाल्या बोगस; 160 कोटींच्या शालार्थ ID घोटाळ्याला नवे वळण

संजय गरुड यांना अटकेनंतर ह्रदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. गरुड हे गेल्या २८ जुलैपासून उपचाराच्या नावाखाली जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल असून, सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांनी नाशिक रोड सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी धाव घेतली आहे. त्यावर न्यायालयाने तपास पथकाकडे लेखी मागितले आहे. त्यावर येत्या गुरुवारी (दि. २७) सुनावणी होण्याची शक्यता आहे.

संजय गरुड यांचा भाऊ व संस्थेचा सहसचिव दीपक गरुडही सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे, तर संजय गरुड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घोटाळ्यातील बड्या राजकीय नेत्यांची नावे उघड होऊ नये म्हणून गरुड यांना रुग्णालयातच ठेवण्याचा प्रयत्न केला गेल्याची चर्चा आहे.

Shalarth ID scam case in Nashik court
Girish Mahajan : नाशिकच्या पालकमंत्रिपदी निवड होताच गिरीश महाजन म्हणाले : ‘मला आज पांडुरंग पावला...’

उपासनीच्या जामिनावर २७ ला निर्णय

शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी सध्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनीही पुन्हा जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. २७) सुनावणी आहे.

उपासनी यांच्या वतीने वैद्यकीय कारणास्तव जामिनाची मागणी करण्यात आली आहे. त्या संदर्भात न्यायालयाने कारागृहाकडून वैद्यकीय अहवाल मागितलेला आहे. उपासनीही गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com