Mamata Banerjee Sarkarnama
देश

BJP Vs Mamata Banerjee : 'ममता बॅनर्जींना बनायचंय पंतप्रधान, म्हणूनच तर..' ; भाजपने लगावला टोला!

Mamata Banerjee NITI Aayog Meeting : जाणून घ्या, भाजपच्या कोणत्या नेत्या ममता बॅनर्जींबद्दल नेमकं काय म्हणाल्या आहेत? याशिवाय काँग्रेस नेते अधीररंजन चौधरींनीही केली आहे टीका

Mayur Ratnaparkhe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीतून संतापून निघून गेल्या. त्यांना बोलण्यास जाणुनबुजून वेळ दिला गेला नाही, सरकारकडून विरोधकांचा अपमान केला जात आहे. असा त्यांनी आरोप केला आहे. यावर आता भाजपकडूनही त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. भाजपकडून खासदार लॉकेट चटर्जी यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार निशाणा साधला आणि म्हटले की, 'त्यांना(ममता बॅनर्जींना) पंतप्रधान बनायचं आहे, म्हणूनच तर त्या हे नाटक करत आहेत.'

भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले की, ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) खोटं बोलत आहेत. पीआयीबी फॅक्ट चेकने याची पुष्टी केली आहे. त्यांना पंतप्रधान, मोठ्या नेत्या बनायचं आहे. यासाठी त्या हे सगळं नाटक करत आहेत. टीएमसीचं राजकारणच नाटकी आहे. ममता बॅनर्जींची अजिबात इच्छा नाही की पश्चिम बंगालचं भलं व्हावं, त्यामुळेच त्या बैठकीमधून निघून गेल्या आहेत.

याशिवाय भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण(Nirmala Sitharaman) यांनीही ममता बॅनर्जी यांच्या या कृतीचा निषेध नोंदवला आणि सांगितले की, प्रत्येक मुख्यमंत्र्यास बोलण्यास योग्य वेळ दिला गेला होता. मात्र ममता बॅनर्जी खोटी कथा रंगवून सांगत आहेत.

एवढंच नाहीतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी(Adhir Ranjan Chaudhary) यांनीही ममता बॅनर्जींवर टीका केली. भाजप शिवाय काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनीही ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला आणि म्हटले की, त्या खोटं बोलत आहेत. नीती आयोगाच्या बैठकीबाबत ममता जे काही सांगत आहेत, मला वाटतं त्या खोटं बोलत आहेत. हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यास बैठकीत बोलूच दिलं गेलं नाही. खरंतर ममता बॅनर्जींना माहीत होतं, तिथे काय घडणार, त्यांच्याकडे सगळी स्क्रीप्ट तयार होती.

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये काय निघालं? -

तेच पीआयबी फॅक्ट चेकमध्ये ममता बॅनर्जींचा दावा फोल ठरल्याचे समोर आले आहे. पीआयबीने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर सांगितले की, हा दावा भ्रामक आहे. तो फेटाळला जात आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये म्हटले गेले आहे की, त्यांना बोलण्यास वेळ दिला गेला होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT