Mamata Banerjee News  Sarkarnama
देश

Mamata Banerjee News : आमदारांच्या पगारात भरघोस वाढ ; मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

West Bengal News : राज्यमंत्र्यांचा पगार १०.९०० वरुन ५०,९०० एवढा करण्यात येणार आहे.

Mangesh Mahale

Kolkata : स्वत:च्या पगारात कुठलीही वाढ न करता मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या पगारात भरघोस वाढ केली आहे. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी विधानसभेत आमदारांच्या पगारात ४० हजार रूपयांची वाढ केली आहे. पश्चिम बंगालमधील आमदारांना पगार हा १० हजारांवरून थेट ५० हजार एवढा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.

ममतादीदी या पगार घेत नाहीत..

अन्य राज्यातील आमदारांना मिळणाऱ्या वेतनाच्या तुलनेत पश्चिम बंगालच्या आमदारांना मिळणारे वेतन कमी असल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून माझ्या पगारात मात्र कुठलीही वाढ केलेली नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून ममतादीदी या पगार घेत नाहीत.

आमदारांच्या पगार वाढीनंतर राज्यमंत्र्यांचा पगार १०.९०० वरुन ५०,९०० एवढा करण्यात येणार आहे. तर कॅबिनेट मंत्र्याचा पगार हा ११ हजारवरुन ५१ हजार होणार आहे. शिवाय आमदारांना मिळणाऱ्या भत्त्यांसह इतर सुविधा या कायम राहणार असल्याचे विधानसभा प्रशासनाने सांगितले.

एकूण रक्कम सुमारे दीड लाखांवर जाणार..

वाढीव वेतन आणि विविध भत्त्यांसह आमदारांना एकूण रक्कम ८१ हजार रुपयांवरुन १.२१ लाख रुपयांवर (प्रति महिना) जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.आता मंत्र्यांना मिळणारी एकूण रक्कम सुमारे दीड लाखांवर जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT