Vishwajit Kadam News : चूक अंगलट आल्याने कुणबी प्रमाणपत्राचा निर्णय; विश्वजित कदमांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या हेतूने हे जाहीर केले ? हे देखील बघावे लागेल.
Vishwajit Kadam eknath shinde
Vishwajit Kadam eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Sangli : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. त्यावर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विश्वजित कदम यांनी भाष्य केले आहे. मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याची चूक अंगलट येणार असल्याचे लक्षात आल्याने राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्र देण्याची किरकोळ घोषणा केल्याची टीका काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांनी केली आहे.

Vishwajit Kadam eknath shinde
Supriya Sule News : लोकसभेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणावर निर्णय घ्या ; सुप्रिया सुळेंची सरकारला सूचना

"निजामशाहीतील दाखले तपासून कुणबी प्रमाणपत्र देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र जातीचे पुरावे शोधण्यासाठी आधीच ओबीसी समाजाला मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी होते, हे पाहवे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या हेतूने हे जाहीर केले ? हे देखील बघावे लागेल," असे कदम यांनी सांगितले.

Vishwajit Kadam eknath shinde
Pankaja Munde News : नुसत्या घोषणांनी आरक्षण मिळणार नाही; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जालन्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर उपोषणकर्ते मनोज जरांगे ठाम आहेत. "वंशावळी" हा शब्द काढा मगच उपोषण मागे घेतो, सरसकट आरक्षण द्या, असे सांगत मनोज जरांगे यांनी निर्णयात सुधारणा करण्याचे सरकारला सुचवले.

"कोणीतरी घोषणा करून आरक्षण मिळणार नाही. कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावे लागेल," अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे."मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी अभ्यास गट स्थापन करून योग्य तो आकडा ठरवला पाहिजे," असे मतदेखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com