नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदी ममता बॅनर्जी कायम राहणार की नाही. याबाबत आज निर्णय होणार आहे. भवानीपूर (Bhabanipur) पोटनिवडणुकीच्या मत मोजनीची सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. त्यामध्ये ममता बॅनर्जी या 3680 मतांनी पुढे आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रियांका तिब्रेवाल यांना 881 मते मिळाली आहेत. मुख्यमंत्री पदी राहण्यासाठी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासाठी या जागेवर विजय महत्वाचे आहे.
भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी कडेकोट बंदोबस्तात सुरु आहे. भवानीपूर व्यतिरिक्त, शमशेरगंज आणि जंगीपूर विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहे. नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक हरल्यानंतर बॅनर्जी या जागेवरून निवडणूक लढवली आहे. भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान झाले. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा आज येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.
सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भवानीपूर मतदारसंघात ५७ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. भवानीपूर कोलकात्यातील विधानसभा मतदारसंघ आहे आणि तो तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. ममता बॅनर्जी २०१६ मध्ये या जागेवरून विजयी झाल्या होत्या. त्यामुळे यावेळी त्या जिंकतील अशी त्यांना आशा आहे. तृणमूलच्या अनेक नेत्यांनी या जागेवर ममता बॅनर्जी यांचा विजय आधीच मान्य केला. तृणमूलसोबतच भाजपनेही आपल्या विजयाचे दावा केला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी कडेकोट बंदोबस्तात सुरु आहे. भवानीपूर व्यतिरिक्त, शमशेरगंज आणि जंगीपूर विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहे. नंदीग्राम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक हरल्यानंतर बॅनर्जी या जागेवरून निवडणूक लढवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.