काका-पुतण्याचा 'बंगला' गोठविला ; निवडणूक आयोगाचा दणका

पशुपती पारस (Pashupati Kumar Paras) आणि चिरास पासवान (Chirag Paswan) यांना निवडणुक आयोगाने (ECI) दणका दिला आहे.
Pashupati  Paras, Chirag Paswan
Pashupati Paras, Chirag Paswansarkarnama
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : लोक जनशक्ति पार्टीत वाद संपण्याची चिन्ह दिसत नाही. कारण केंद्रीय मंत्री पशुपती पारस (Pashupati Kumar Paras) आणि चिरास पासवान (Chirag Paswan) यांना निवडणुक आयोगाने (ECI) दणका दिला आहे. निवडणूक आयोगाने लोकजनशक्ती पक्षाचे बंगला हे निवडणूक चिन्ह गोठविले आहे. पारस आणि पासवान यांनी दोघांनी या चिन्हावर दावा केला होता. यानंतर आता काका-पुतण्यातील ताण अजून विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार तूर्तास बंगला हे निवडणूक चिन्ह पशुपती पारस अथवा चिराग पासवान यांच्यापैकी कोणालाही मिळणार नाही. सद्यःस्थितीत हंगामी उपाययोजना म्हणून दोन्ही गटांना आपल्या उमेदवारांसाठी नवे नाव आणि स्वतंत्र निवडणूक चिन्ह घेता येईल, अशी सूचना निवडणूक आयोगाने केली आहे.

Pashupati  Paras, Chirag Paswan
मला खडसेंचा राग नव्हे कीव येते ; महाजनांचा पलटवार

लोकसभाध्यक्षांकडूनही या निवडीला मान्यता मिळाल्यानंतर पारस यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची नियुक्ती करून स्वतःला पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर केले. दुसरीकडे, चिराग पासवान यांनीही लोकजनशक्ती पक्षाची कार्यकारिणी बोलावून पारस गटाचे निर्णय पक्षविरोधी असल्याचे म्हणत फेटाळले होते. सोबतच चिराग पासवान यांनी पारस यांच्याआधी निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन निवडणूक चिन्हावर हक्क सांगितला होता.

लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांच्या निधनानंतर पासवान कुटुंबीयांमध्ये त्याचप्रमाणे लोकजनशक्ती पक्षातही फाटाफूट होऊन पक्षावरील नियंत्रणावरून वाद सुरू झाला होता. पक्षात दोन गट पडले होते. लोकजनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांचे नेतृत्व झुगारून पशुपती पारस यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली. सध्या चिरास पासवान बिहारमध्ये पदयात्रेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com