Manipur Bandh Sarkarnama
देश

Manipur Bandh : मणिपूर पुन्हा बंद, जनजीवन विस्कळीत; आता काय घडलं?

Manipur Bandh Over Killing Of Village Guard : मणिपूरमध्ये पुन्हा बंद पुकारण्यात आला आहे...

सरकारनामा ब्यूरो

48-Hour Bandh In Manipur :

मणिपूरमधील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. संयुक्त कृती समितीने मणिपूरमध्ये 20 जानेवारी ते 22 जानेवारी असा दोन दिवसांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. तखेलामबम मनोरंजन सिंह या 23 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे.

20 जानेवारीला पहाटे 5 वाजता हा बंद सुरू झाला. हा बंद 22 जानेवारी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. संशयित दहशतवाद्यांनी गावाची सुरक्षा करणाऱ्या तखेलामबम याची हत्या केल्याचा संशय आहे. Manipur मध्ये ही घटना 17 जानेवारीला घडली.

तरुणाच्या हत्ये प्रकरणी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला 24 तासांची डेडलाइन देण्यात आली आहे, अशी माहिती संयुक्त कृती समितीच्या समन्वयकाने दिली आहे. पण दिलेल्या डेडलाइनमध्ये राज्य सरकारने कुठलाही प्रतिसाद दिला नाही, असा आरोप समितीने केला आहे. (Rahul Gandhi Manipur News )

राज्यात तैनात नसलेल्या केंद्रीय सुरक्षा दलांना राज्यातून हटवून राज्य सरकारच्या सुरक्षा दलांना तैनात करावे. तसेच एनआरसीची मणिपूरमध्ये अंमलबजावणी करावी, कुकी दहशतवादी आणि सरकारमध्ये झालेल्या करारानुसार कुकींनी कारवाया थांबवाव्यात, अशा प्रमुख मागण्यांसह अनेक मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मणिपूरमध्ये तरुणाच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ पुकारलेल्या 48 तासांच्या बंदमुळे राज्यातील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राजधानी इम्फाळसह इतर जिल्ह्यातील बाजारपेठा आणि वर्दळीच्या ठिकाणी शुकशुकाट आहे. मात्र, बंदच्या काळात सर्व अत्यावश्यक सेवा आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी आहे.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT