Ayodhya Ram Mandir: उद्या सार्वजनिक सुट्टी मिळणार की नाही?, आज सुनावणी; एका धर्माला प्रोत्साहन देता...

Bombay High Court: . राज्य सरकारने स्वतःला कोणत्याही धर्माशी जोडू नये
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News: उद्या (सोमवारी) अयोध्येतील राम मंदिरामध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. केंद्र सरकारने या दिवशी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. तर महाराष्ट्र सरकारनेही उद्या सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुट्टीला विधी शाखेच्या चार विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली.

या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष खंडपीठाचे न्यायाधीश जी एस कुलकर्णी आणि निला गोखले यांच्या समोर आज (रविवारी) सुनावणी आहे.

वेदांत अग्रवाल, शिवांगी अग्रवाल, सत्यजित साळवे, आणि खुशी बंगिया या विधी शाखेच्या चार विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने स्वतःला कोणत्याही धर्माशी जोडू नये किंवा कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन देता कामा नये, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला आहे.

धार्मिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणे हे घटनेत समाविष्ट असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे, असे या याचिकाकर्त्यांचे म्हणणं आहे.

अयोध्येत 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीचा आज (रविवार) सहावा दिवस आहे. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होण्यापूर्वी अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या. आता 23 जानेवारीपर्यंत प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांनाच पास दाखवून प्रवेश मिळेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्या 2000 क्विंटल फुलांनी सजवली जात आहे. सकाळी रामललाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. सायंकाळी शव्याधिवाससह 12 निवास होतील. सायंकाळच्या आरतीनंतर विधी पूर्ण होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राणप्रतिष्ठेसाठी उद्या (ता.22)अयोध्येत येत आहेत. ते येथे चार तास थांबतील. मोदी हे आज (ता.21)अयोध्येत येणार असल्याची चर्चा होती, हे वृत्त पीएमओ कार्यालयानं फेटाळलं आहे. मोदी उद्या अयोध्येत जाणार असल्याचे प्रशासनाने म्हटलं आहे.

Ayodhya Ram Mandir
Maratha Reservation :'शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदेंनी फसवले', मराठा आरक्षणासाठी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com