CM Lalduhoma, CM N Biren Singh Sarkarnama
देश

Manipur : नवीन सरकार बनताच मिझोराम अन् मणिपूरचे मुख्यमंत्री भिडले...

Mizoram : लालदूहोमा यांनी मणिपूरमधील भाजप सरकारला डिवचले होते.

Rajanand More

Manipur Issue : मिझोराममध्ये भाजपच्या एनडीएतील मित्रपक्षाची सत्ता गेल्यानंतर शेजारील मणिपूर राज्याशी वाद सुरू झाला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी मिझोरामचे नवे मुख्यमंत्री लालदुहोमा यांना कडक शब्दांत सुनावले आहे. मणिपुरच्या अंतर्गत वादात हस्तक्षेप करू नका, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करा, असे बीरेन सिंह यांनी म्हटले आहे.

लालदुहोमा (Lalduhoma) यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मणिपूरमधील (Manipur) हिंसाचाराचा संदर्भ देत वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, आपले सरकार म्यानमार मधील शरणार्थी आणि मणिपूरमधून विस्थापित झालेल्या लोकांना आश्रय व सहाय्य करणे सुरूच ठेवेल. मणिपूरच्या पोलिसांनी मोरेहमधील लोकांना त्रास देऊ नये, असे म्हणत लालदूहोमा यांनी मणिपूरमधील भाजप (BJP) सरकारला डिवचले होते.

एका कार्यक्रमात बोलताना बीरेन सिंह म्हणाले, मणिपूरमध्ये जे काही झाले तो आमचा अंतर्गत मुद्दा आहे. आमच्या बहुतेक हितचिंतकांनी मदतीसाठी इच्छा व्यक्त केली आहे. पण मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांनी मोरेहमधील स्थितीबाबत केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांना मोरेहमध्ये काय झाले हे माहिती नाही. तिथे सर्व जाती-धर्माचे लोक राहतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मिझोराममध्ये ब्रू जमातीचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मी कोणतेही वक्तव्य केले नव्हते. त्यामुळे कृपया त्यांनी मणिपूरमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन बीरेन सिंह यांनी लालदुहोमा यांना केले आहे. दरम्यान, मोरेहमधून म्यानमार सीमावर्ती भागातील निवासी सोडून इतर जातींच्या लोकांना हाकलून देण्यात आल्याचा आरोप होत आहे.

मिझोराममधील जातीय संघर्षात 1997 मध्ये ब्रू जमातीचे लोक हे राज्य सोडून शेजारील राज्यात गेले होते. बांग्लादेश आणि त्रिपुराला लागून असलेल्या पश्चिम मिझोराममधील क्षेत्र वेगळे करून स्वायत्त जिल्हा परिषद निर्माण करण्याच्या मागणीतून हा जातीय संघर्ष वाढला होता. मिझोराममध्ये जोरम पीपल्य मुव्हमेंट पक्षाची सत्ता आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लालदुहोमा यांनी मणिपूरच्या मुद्यावरून तेथील सरकारवर निशाणा साधला होता.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT