Diya Kumari : राजकुमारीच्या हातात सत्तेच्या चाव्या; श्रीरामाच्या वंशज असल्याचा दावा

Rajasthan Politics : दिया कुमारी या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.
Diya Kumari
Diya KumariSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan CM : राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी भजनलाल शर्मा यांची वर्णी लागली आहे. त्यांच्या जोडीला दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत. त्यामधील एक नाव जयूपरच्या राजघराण्यातील आहे. राजकुमारी दिया कुमारी यांना भाजपने उपमुख्यमंत्रिपदाचा मान दिला आहे. दिया कुमारी यांनी आपण रामाचे वंशज असल्याचा दावा यापूर्वी केला होता.

दिया कुमारी (Diya Kumari) या विद्याधर नगर विधानसभा (Assembly) मतदारसंघातून विजयी झालेल्या आहेत. त्यांना तब्बल 1 लाख 58 हजार मते मिळाली आहे. दिया कुमारी या दिवंगत ब्रिगेडिअर भवानी सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांच्या कन्या आहेत. त्यांनी दहा वर्षांपूर्वी राजकारणात पाऊल ठेवले होते. पहिल्यांदा 2013 मध्ये माधोपूर विधानसभा मतदारसंघातून त्या विधानसभेत गेल्या होत्या. (Rajasthan Deputy CM and BJP Leader Diya Kumari)

Diya Kumari
Rajasthan Chief Minister : राजस्थानमध्येही भाजपचं धक्कातंत्र, वसुंधरा राजेंचा पत्ता कट, भजनलाल शर्मा नवे मुख्यमंत्री

दिया कुमारी या 2019 मध्ये राजसमंद लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. पक्षाने त्यांना यावेळी पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले. त्या पुन्हा विद्याधर नगर मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आल्या. आता त्यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिया कुमारी यांनी 2019 मध्ये आपण भगवान श्रीराम यांचा मुलगा कुश यांचे वंशज असल्याचा दावा केला होता. आम्ही रामाचे वंशज आहोत. आमच्या हस्तलिखितांमध्ये, वंशावळीत आणि कागदपत्रांमध्ये सर्व संदर्भ असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांनी ताजमहालही आपला महाल असल्याचा दावा केला होता. हा राजवाडा होता. त्याबाबतची कागदपत्रेही आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला होता.

दिया कुमारी यांचे शालेय शिक्षण जयपूरमधील महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कूल आणि नवी दिल्लीतील मॉडर्न स्कूलमध्ये झाले. उच्च शिक्षण लंडनमधील चेल्सी स्कूल ऑफ आर्ट्समध्ये झाले.

 (Edited By - Rajanand More)

Diya Kumari
Shivraj Singh Chouhan : लाडक्या बहिणी गळ्यात पडून ढसाढसा रडल्या; समजूत काढता-काढता ‘मामा’ही भावूक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com