Manipur Violence News :
Manipur Violence News : Sarkarnama
देश

Manipur Violence News : मणिपूरमध्ये 40 दहशतवाद्यांना कंठस्नान; मुख्यमंत्री बिरेन सिंहांची माहिती..

सरकारनामा ब्यूरो

Manipur Violence News : मणिपूर राज्यात हिंसाचार थांबण्याची चिन्हे दिसत नाही. आज पुन्हा मणिपूरमधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये विद्रोही गट आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये झटापट झाली. आज रविवारी सकाळच्या वेळेस राजधानमी इंफाळच्या घाटी भागात आणि आजूबाजूच्या परिसरात अशा एकूण पाच ठिकाणी हल्ला घडून आला.

मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री बीरेन सिंह याबाबत आपली बाजू ठेवताना म्हणाले की, "आतापर्यंत मणिपूर राज्यात एकूण ४० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ४० दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलेले आहे. तर काही दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेलं आहे. राज्याची ही कारवाई दहशतवादाविरू्द्ध आहे. दहशतवादाच्या प्रत्युत्तरादाखल राज्याच्या स्वसंरक्षणासाठी करण्यात आलेली कारवाई आहे,"असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी हिंसाचाराविरूद्ध सुरक्षा दलांनी आणि मणिपूर पोलिसांनी यांनी आतापर्य़ंत राबवलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, ज्या दहशतवादी समूहाविरूद्ध कारवाई करण्यात आली, त्यांच्याजवळ अत्याधुनिक शस्त्रे होती. अत्याधुनिक शस्त्रांनी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला होता. ते सामान्य लोकांवर एम-१६ आणि एके-४७ असोल्ट रायफल आणि स्नाइपर गनचा देखील वापर करत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दहशतवादी समूह मणिपूरमधील अनेक गावांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. लोकांचे घरं जाळण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे सुरक्षा दलांकडून गोळीबार सुरू केला. नि:शस्त्र लोकांवर हल्ले करत तोडफोड करत होते. चकमकी दोन समूहामध्ये झालेली नसून, कुकी अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT