Manish Sisodia Two Crore Bribes :
Manish Sisodia Two Crore Bribes :  Sarkarnama
देश

Manish Sisodia Case Update : मनीष सिसोदियांनी घेतली 2 कोटींची लाच; ईडीचा पहिल्यांदाच खळबळजनक आरोप!

सरकारनामा ब्यूरो

New Delhi News : दिल्ली राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी कथित मद्य घोटाळ्यात त्यांचे निकटवर्तीय दिनेश अरोरा यांच्या माध्यमातून तब्बल २ कोटी २० लाख रुपयांची लाच घेतली होती, असा खळबळजनक दावा अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने ) आरोपपत्रात केला आहे.

उत्पादन शुल्क धोरण 2021-22 मध्ये व्यापारी अमित अरोरा यांना फायदा पोहचवण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचे ईडीने म्हंटले आहे. असा आरोप ईडीकडून पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

आरोपपत्रात म्हंटले आहे की, "दिनेश अरोरा आणि अमित अरोरा जे मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. हे दोघेही दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील अनेक बेकायदेशीर कामांमध्ये गुंतल्याचे तपासात समोर आले आहे." दोघांनाही मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांनी साऊथ ग्रुपशिवाय इतर लोकांसोबतही षडयंत्र रचल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. सिसोदिया यांनी एक्साइज पॉलिसी 2021-22 मध्ये लाभ घेण्यासाठी अमित अरोरा यांच्यामार्फत दिनेश अरोरा यांच्याकडून 2.2 कोटी रुपयांची लाच घेतली, असा आरोप करण्यात आला आहे.

मनी लाँड्रिंगच्या विरोधात काम करणाऱ्या केंद्रीय तपास संस्थेनेही आरोपांना बळ देण्यासाठी अमित अरोरा यांच्या वक्तव्याचा दाखला दिला आहे. आम आदमी पक्षाकडून मात्र एक निवेदन जाहीर करत, सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपने म्हंटले आहे की, 'हे पूर्णपणे धादांत खोटे आरोप आहे. ईडीचे आरोपपत्र निव्वळ कपोलकल्पित आहे. ईडीने यापूर्वीईडीनेही संजय सिंह यांच्यावर आरोप केले होते आणि नंतर ते मागे घेण्यात आले होते. त्याचप्रमाणे हा देखील पूर्णपणे खोटा आरोप आहे.

सिसोदिया यांना अमित अरोरा यांच्या कंपनीकडून रोख स्वरूपात लाच देण्यात आल्याचे ईडीच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. 'त्याने (अमित अरोरा) त्यांच्या कंपन्यांचे खाते तपशीलवार सादर केले आहेत, तर ही रक्कम दैनंदिन विक्रीतून येणार्‍या रोख रकमेतून अदा करण्यात आली.

मनीष सिसोदिया यांना पैसे देण्याच्या उद्देशाने अनेक तारखांना रोख रक्कम जमा न केल्याचा तपशील यात आहे. ईडीने म्हटले आहे की, '1 कोटी रुपये 2021 मध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात देण्यात आले होते. तर उर्वरित 1.2 कोटी रुपये पुढील 2-3 महिन्यांत देण्यात आले होते. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT